Asaduddin Owaisi on UCC : अमित शाहांचा UCC निर्धार; ओवैसींचा थेट पलटवार, म्हणाले- ‘मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा हेतू’

Amit Shah backs UCC in 21 NDA states before 2029 as Owaisi hits back at BJP : अमित शाहांनी 2029पूर्वी भाजप-एनडीएशासित राज्यांमध्ये UCC लागू करण्याचा निर्धार व्यक्त केल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपवर मुस्लिमांना लक्ष्य केल्याचा आरोप करत गोव्यात UCC लागू करण्याचे आव्हान दिले.
Asaduddin Owaisi on UCC
Asaduddin Owaisi on UCCSarkarnama
Published on
Updated on

Asaduddin Owaisi on Uniform Civil Code (UCC) : केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी, मुंबईतून लोकसभेच्या 2029 पूर्वी 21 राज्यात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी होईल, असा मोठा निर्धार व्यक्त करताच त्याचे पडसाद देशात उमटू लागले आहे.

एनडीएमधील मित्रपक्षांकडून त्यावर विरोधाच्या प्रतिक्रिया उमटत असताना, भाजपचा कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी, अमित शाह यांच्या या निर्धारामागील राजकीय हेतूवर घणाघात केला आहे.

AIMIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी, "भाजपला समानतेच्या उद्देशाने समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याचा प्रयत्न करत नाही. भाजपने आपल्या राज्यांमध्ये आणि सरकारच्या पातळीवर UCC लागू करण्यामागे केवळ भारतातील 18 कोटी मुस्लिमांना लक्ष्य करण्याचा उद्देश आहे." असे करताना भाजप आणि अमित शाह भारतीय संविधानातील अनुच्छेद 25 (धर्मस्वातंत्र्य), अनुच्छेद 14 (समानतेचा अधिकार), अनुच्छेद 26 आणि 29 यांचे उल्लंघन करत आहेत, असा घणाघात केला आहे.

भाजपची (BJP) ही भूमिका समानतेसाठी नसून, केवळ मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी आहे. या देशाचा आत्मा आणि मूलभूत विचार हा बहुविधतेवर आधारित आहे. अमित शाह, भाजप आणि RSS हिंदू नसलेल्या लोकांवर हिंदू कायदा लादण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप असदुद्दीन ओवैसी यांनी केला आहे.

Asaduddin Owaisi on UCC
Uniform Civil Code : 2029 पूर्वी 21 राज्यांत समान नागरी कायदा; अमित शहांचा मोठा निर्धार

मोदी सरकारनेच स्थापन केलेल्या विधी आयोगाने आपल्या अहवालात UCC भारतासाठी ना आवश्यक आहे, ना इष्ट, असे म्हटले आहे. याकडेही असदुद्दीन ओवैसी यांनी लक्ष वेधले आहे.

Asaduddin Owaisi on UCC
Sanjay Gaikwad Case : विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर संजय गायकवाड आक्रमक; फडणवीसांवर थेट गंभीर आरोप

मला एक प्रश्न विचारायचा आहे की, तुमच्या राज्यांमध्ये ‘डिस्टर्ब्ड एरियाज अॅक्ट’का आहे? या कायद्यामुळे एका हिंदू व्यक्तीला आपली मालमत्ता मुस्लिम व्यक्तीला विकता येत नाही. तसेच ‘लव्ह जिहाद’संदर्भात कायदे का करण्यात आले आहेत? गोव्यात निवडणुका जवळ येत आहेत. मी अमित शाह, भाजप आणि RSSला आव्हान देतो, गोव्यात UCC लागू करून दाखवा, असेही असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले.

अमित शाह नेमके काय म्हणाले

लोकसभा निवडणूक 2029मध्ये होत असल्याचा संदर्भ देताना, ‘‘मुस्लिम महिलांना समान अधिकार देताना तिहेरी तलाक रद्द करण्यात आला. अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यात आला असून, 2029पूर्वी भाजप व ‘एनडीए’ची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायदा लागू करू,’’ असे अमित शाह यांनी मुंबईत म्हटले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com