Nirmala Sitharaman : फोटो काढण्याची विनंती करणाऱ्या कार्यकर्त्याला सीतारमण यांनी त्यांच्या भाषेत झापलं

Nirmala Sitharaman : मॅडम ,आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे,"असे तो कार्यकर्ता सीतारमण यांना म्हणाला होता.
Nirmala Sitharaman
Nirmala Sitharamansarkarnama
Published on
Updated on

पुणे : बारामती लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने (bjp)कंबर कसली आहे. भाजपच्या (BJP) मिशन बारामती (Baramati) अभियानाला सुरुवात झाली आहे. त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) या दोन दिवसापासून बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी या अभियनांतर्गत काल (गुरुवारी)बारामतीचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी पुण्यातील एका कार्यकर्त्याच्या घरी बूथ अध्यक्षांची बैठक घेतली. बैठक झाल्यानंतर त्या कार्यकर्त्याने निर्मला सीतारमण यांना त्यांच्यासोबत एक फोटो काढण्याची विनंती केली.

कार्यकर्त्याची मागणी एकूण अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्याच्यावर भडकल्या. फोटो काढण्याच्या आग्रहावर निर्मला सीतारामन यांनी त्या कार्यकर्त्याला चांगलेच सुनावले. निर्मला सीतारण त्याचा झापत असल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

Nirmala Sitharaman
राष्ट्रवादीच्या नेत्यावर शिक्षिकेने केला गुन्हा दाखल ; अनैसर्गिक अत्याचाराचा गंभीर आरोप

"मॅडम आमचं पूर्ण कुटुंब सकाळपासून तुम्हाला भेटण्यासाठी थांबलं आहे,आम्हाला तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे,"असे तो कार्यकर्ता सीतारमण यांना म्हणाला होता.

या दौऱ्याची सुरुवात सीतारमण यांनी गुरुवारी खडकवासला विधानसभा मतदारसंघातून केली. धायरी‌ येथील मुक्ताई गार्डन येथे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.निर्मला सीतारमण म्हणाल्या, " बारामती लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीत केंद्रातून काही तरी तडजोड होते, या विचारातून कार्यकर्ते काम करत नाहीत, मात्र या वेळी केंद्रातून कोणतीही तडजोड होणार नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. बारामतीमधील प्रलंबित विकासकामांसाठी केंद्राकडून नक्की मदत करू व निधी देऊ,"

आमदार राहुल कुल म्हणाले, "केंद्रातील नेते बारामतीला येऊन बारामती विकास मॉडेलचे गुणगान गातात, त्यामुळे कार्यकर्त्यांना काम करताना अडचणी निर्माण होतात,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com