BJP OBC Morcha : भाजपच्या ओबीसी मोर्चात मोठे फेरबदल; राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चौघांची वर्णी

BJP OBC Morcha National Executive : भाजपने एक्सवर पोस्ट करत या नियुक्त्यांची माहिती दिली. ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सात, राष्ट्रीय महामंत्रीपदी तीन आणि राष्ट्रीय मंत्रीपदी सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 37 सदस्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.
BJP OBC Morcha | National Executive | Maharashtra Leaders
BJP OBC Morcha | National Executive | Maharashtra LeadersSarkarnama
Published on: 
Updated on: 

Navi Delhi News, 22 Nov : भारतीय जनता पक्षाने (भाजप) ओबीसी मोर्चाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी शनिवारी (ता. 21) राष्ट्रीय पदाधिकारी, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि विविध विभागांच्या जबाबदाऱ्यांवर सदस्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रातील चार जणांना या नव्या कार्यकारिणीत स्थान मिळाले आहे.

भाजपने एक्सवर पोस्ट करत या नियुक्त्यांची माहिती दिली. ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी सात, राष्ट्रीय महामंत्रीपदी तीन आणि राष्ट्रीय मंत्रीपदी सात जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या 37 सदस्यांचीही घोषणा करण्यात आली आहे. ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी आसामचे जोगेन मोहन, ओडिशाच्या ममता मोहंता, उत्तर प्रदेशचे संगम लाल गुप्ता, महाराष्ट्राचे बबनराव रावजी चौधरी, दिल्लीचे सत प्रकाश राणा, बिहारचे अर्जुन सहानी आणि उत्तर प्रदेशच्या संगीता बलवंत बिंद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामंत्रीपदी दिल्लीचे गजेंद्र यादव, कर्नाटकचे प्रमोद मधवाराज आणि छत्तीसगडचे ललित चंद्राकर यांची नियुक्ती झाली आहे. राष्ट्रीय मंत्रीपदी गुजरातचे दशरथजी ठाकोर, तामिळनाडूचे टी. वरथराजन, झारखंडचे संजीव कुमार ऊर्फ बबलू भगत, हरियाणाच्या सरिता जांगिड, तेलंगणाचे कडगांची रमेश, मध्य प्रदेशचे वैभव पवार आणि बिहारचे भीम कुमार साहू यांना संधी देण्यात आली आहे.

राष्ट्रीय कोषाध्यक्ष, राष्ट्रीय कार्यालय मंत्री, सहकार्याल मंत्री, मीडिया संयोजक, सोशल मीडिया संयोजक यासह विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत. यासह भाजपने विविध राज्यांतील 37 जणांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य नियुक्ती केली आहे.

युझवेंद्र चहलसह तिघांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती

राष्ट्रीय कार्यकारिणीच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी ओडिशाचे प्रा. अद्वैत चरण गणनायक, भारतीय क्रिकेटपटू युझवेंद्र सिंह चहल आणि उत्तर प्रदेशच्या अॅड. सीमा समृद्धी कुशवाहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चहल याने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्याला ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

BJP OBC Morcha | National Executive | Maharashtra Leaders
Congress news : मला काँग्रेसमध्ये परत यायचंय, माफ करा! विरोध होताच भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या लेकीने जोडले हात

महाराष्ट्रातील चौघांना राष्ट्रीय स्तरावर जबाबदारी

या नियुक्त्यांमध्ये महाराष्ट्रातील चार जणांना संधी मिळाली आहे. बबनराव चौधरी यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. राहुल केंद्रे यांची राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. तर मुंबईतील हर्षदा फरांदे आणि डॉ. स्मिता काळे यांनाही राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.