UP Rajya Sabha election : PM मोदी-शहांचे धक्कातंत्र, भाजपकडून सात नेत्यांचा पत्ता कट; खासदारकीसाठी नव्याना संधी देत वाढविली धडधड

BJP Rajya Sabha candidates, Hardeep Singh Puri : नव्या उमेदवारांमध्ये धरमपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, प्रियांका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रृती गंगवार यांचा समावेश आहे.
Amit Shah, Narendra Modi
Amit Shah, Narendra Modisarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP UP Rajya Sabha list : भाजपकडून सोमवारी उत्तर प्रदेशातील दहा जागांसाठी होत असलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आठ उमेदवारांची नावे जाहीर केली. ही यादी जाहीर करताना पक्षाने यापूर्वी राज्यातून निवडून गेलेल्या एकाही नेत्याला उमेदवारी दिलेली नाही. विशेष म्हणजे उमेदवारी न मिळालेल्यांच्या यादीत दोन केंद्रीय मंत्र्‍यांचाही समावेश आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि बी. एल. वर्मा यांचीही राज्यसभेची मुदत संपत असताना त्यांनाही भाजपने उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे त्यांचे मंत्रिपद जाणार, हे निश्चित मानले जात आहे. पुरी आणि वर्मा यांच्याप्रमाणेच अरुण सिंह, सीमा द्विवेदी, नीरज शेखर, ब्रिज लाल आणि गीता शाक्य या विद्यमान खासदारांचेही तिकीटही कापण्यात आहे.

उत्तर प्रदेशातून काही दिवसांपर्यंत राज्यसभेचे खासदार राहिलेले दिनेश वर्मा यांनी नुकताच राजीनामा दिला होता. ते आता अंदमान आणि निकोबारचे नायब राज्यपाल आहेत. याचाच अर्थ भाजपने एकाही उमेदवाराला रिपीट केलेले नाही. उत्तर प्रदेशात पुढील काही महिन्यांत विधानसभेची निवडणूक आहे. यापार्श्वभूमीवर भाजपच्या या रणनीतीने नेत्यांना धक्का बसला आहे.

Amit Shah, Narendra Modi
Rahul Gandhi News : माजी खासदार लेक भाजपमध्ये, पाचवेळा आमदार राहिलेल्या वडिलांची थेट राहुल गांधींसोबत हातमिळवणी

नव्या उमेदवारांमध्ये धरमपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडे, प्रियांका सिंह रावत, राम प्रताप सिंह चौहान आणि श्रृती गंगवार यांचा समावेश आहे. भाजपने निवडणुकीचा विचार करून जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये तीन ओबीसी, दोन एससी आणि तीन खुल्या गटातील उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन महिलाही आहेत. राज्यसभेसाठी १६ ऑक्टोबर रोजी मतदान आहे.

Amit Shah, Narendra Modi
Supreme Court news : निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात झटका; Form 6 बाबत सरन्यायाधीशांनीच पाडले तोंडावर

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता भाजप आणि मित्रपक्षांचे सात तर विरोधकांचे दोन उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. भाजपने आठ उमेदवार मैदानात उतरविले असून समाजवादी पक्षानेही तिसरा उमेदवार दिल्यास काँटे की टक्कर होणार आहे. भाजपसह सपालाही अतिरिक्त उमेदवार निवडून आणण्यासाठी मोजक्याच मतांची गरज आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यास क्रॉस वोटिंग होईल, हे जवळपास निश्चित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com