

BJP Protest Latest News : हिमाचल प्रदेशच्या शिमल्यातील सीटीओजवळ भाजपचे धरने आंदोलन झाले. या आंदोलनात भाजप नेते तथा राज्यसभा खासदार हर्ष महाजन यांनी हजेरी लावली. याकार्यक्रमादरम्यान त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत राज्य सरकार विरोधात जोरदार टीका केली. ज्यानंतर माध्यमांशी चर्चा करत करत असताना त्यांना अचानक चक्कर आली. यानंतर कार्यकर्त्यांना महाजन यांना शिमल्यातील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथे तातडीने उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (ता.२७) घडली.
याबाबत मिळालेली महिती अशी की बीडीसी अध्यक्ष आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पदांच्या निर्मितीस होणाऱ्या कथित विलंबाच्या निषेधार्थ भाजपने शिमल्यातील सीटीओजवळ धरने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली होती. तर या आंदोलनात हर्ष महाजन यांनी देखील सहभाग घेतला.
यावेळी त्यांनी काँग्रेस सरकारवर जोरदार टीका केली. तसेच आंदोलन संपल्यानंतर त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. यानंतर भाजप आमदार बलवीर वर्मा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी हर्ष महाजन यांना अचानक चक्कर आली आणि ते अडखळू लागले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी तात्काळ त्यांना आधार सावरले. आणि त्यांना तातडीने उपचारासाठी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज शिमला येथे दाखल केले.
उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर हर्ष महाजन यांनी सांगितले की आता त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली आहे. मागील दोन दिवसांपासून सतत धावपळ आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांचा रक्तदाब (बीपी) अचानक कमी झाला होता. त्यामुळे शरीराचा समतोल बिघडून त्यांना ही समस्या उद्भवली.
तर तातडीने IGMC येथील डॉक्टरांनी उत्तम उपचार केल्यानंतर ते आता पूर्णपणे स्वस्थ आहेत असेही त्यांनी सांगितले. तर एक व्हिडिओही शेअर करून समर्थकांचे आभार मानले.
भाजप नेते रुग्णालयात दाखल
या घटनेनंतर ता पदाधिकारी आणि नेते हर्ष महाजन यांची भेट घेत आहेत. हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल आणि माजी मुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर यांनी रुग्णालयात जाऊन हर्ष महाजन यांची विचारपूस केली. तसेच भाजप नेते आणि कार्यकर्ते देखील त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात धाव घेत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.