Citizenship Amendment Act : देशात लागू होणार CAA? पंतप्रधान मोदी करणार मोठी घोषणा...

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात जनतेशी संवाद साधणार आहेत. या वेळी ते सीएएबाबत मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आज मध्यरात्रीपासून देशात लागू होण्याची शक्यता आहे. याबाबतचे नोटिफिकेशन केंद्र सरकारडून जारी केले जाऊ शकते. त्याआधी थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार असून, त्यामध्ये ‘सीएए’बाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काही दिवसांपूर्वीच सीएएच्या अंमलबजावणीबाबत संकेत दिले होते. लोकसभा निवडणुकीआधी या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल, असे संकेत मिळत होते. त्यानुसार आजच सरकारकडून याबाबतचे नोटिफिकेशन काढले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पंतप्रधान मोदी जनतेशी संवाद साधताना याबाबत घोषणा करतील, अशीही चर्चा आहे. लोकसभा आणि राज्यसभेत हा कायदा मंजूर होऊन तीन वर्षे लोटली आहेत, पण कायद्यातील काही तरतुदींमुळे वाद निर्माण झाला. त्यामुळे त्याची अंमलबजावणी रखडली होती. अखेर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून कायदा लागू केला जाणार असल्याची शक्यता आहे.

काय आहे कायदा?

सीएए कायद्यात पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथील धार्मिक अल्पसंख्याकांच्या भारतात पुनर्वसनाचा म्हणजेच त्यांना नागरिकता देण्याचा मुख्य उद्देश आहे. या तिन्ही देशांमध्ये धार्मिक अल्पसंख्याक म्हणजे प्रामुख्याने हिंदू आणि शीख नागरिकांवर अत्याचार होतात. त्यातून गेल्या 75 वर्षांत लाखो नागरिकांनी भारतात आश्रय घेतला आहे. या निर्वासितांना भारताचे कायदेशीर नागरिकत्व देण्याची तरतूद या कायद्यात आहे.

का होतोय विरोध?

सीएए कायद्याला विरोध करणाऱ्यांच्या मते बांगलादेशातून, अफगाणिस्तानातून अनेक मुसलमान नागरिकांनीही भारतात आश्रय घेतला आहे, त्यांना भारतीय नागरिकत्व देण्याच्या संबंधात या कायद्यात काहीही नाही. शिवाय जे नागरिकत्व नोंदणी रजिस्टर अमलात येणार आहे. त्यामुळे तर मुसलमानांना या देशातून बाहेर काढणे किंवा हद्दपार करणे हा मोदी सरकारचा डाव असल्याची टीका केली जात आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com