ED Arrest Jyotipriya Mallick : मुख्यमंत्री ममतादीदींना सर्वात मोठा धक्का; कॅबिनेट मंत्री मलिकांना ईडीकडून अटक!

West Bengal Minister Jyotipriya Mallick Arrested : स्वीय सहायकांच्या घरांसह इतर आठ फ्लॅटवर छापे टाकले जात आहेत.
ED Arrest West Bengal Minister Jyotipriya Mallick
ED Arrest West Bengal Minister Jyotipriya MallickSarkarnama
Published on
Updated on

ED Arrest West Bengal Minister Jyotipriya Mallick : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पश्चिम बंगालचे वनमंत्री आणि माजी अन्न पुरवठा मंत्री ज्योतिप्रिय मलिक यांना रेशन वितरणातील कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 20 तासांच्या चौकशीनंतर अटक केली आहे.

आज शुक्रवारी पहाटे (दि.२७ ऑगस्ट) साडेतीन वाजण्याच्या सुमारास मलिक यांना अटक करण्यात आली. अटकेपूर्वी मलिक म्हणाले की, मी एका षडयंत्राचा बळी आहे, मी एवढेच सांगू शकतो." (Latest Marathi News)

ED Arrest West Bengal Minister Jyotipriya Mallick
सोमय्यांचे पश्चिम बंगाल कनेक्शन: राऊतांनी केलं उघड

काही कोटी रुपयांच्या कथित रेशन वितरण घोटाळ्याच्या संदर्भात सुरू असलेल्या तपासासंदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी पहाटे मलिकच्या जागेवर छापे टाकण्यास सुरुवात केली.

अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी केंद्रीय दल पथकाच्या मदतीने कोलकाता येथील सॉल्ट लेक परिसरात असलेल्या राज्याचे वनमंत्री मलिक यांच्या दोन फ्लॅटवर छापा टाकला. "ही छापेमारी म्हणजे सूडाच्या राजकारणाशिवाय दुसरे काही नाही", असे तृणमूल काँग्रेसने म्हटले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंत्री मलिक यांच्या माजी स्वीय सहायकांच्या घरांसह इतर आठ फ्लॅटवर छापे टाकले जात आहेत. आठ अधिकारी मलिक यांच्या निवासस्थानांवर छापे टाकत आहेत. आम्ही त्यांच्या माजी स्वीय सहायकाच्या डमडम येथील निवासस्थानी आणि इतर काही ठिकाणी झडती घेत आहोत."

केंद्रीय तपास यंत्रणेने यापूर्वीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि मलिक यांच्याशी संबंध असलेल्या एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीशी असलेल्या त्याच्या संबंधाबाबत मलिक यांची चौकशी करण्यात येत असून, मंत्र्यांच्या बँक खात्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

ED Arrest West Bengal Minister Jyotipriya Mallick
Mamata Banerjee ED Summons : मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ; खासदार भाच्याला ईडीचे समन्स!

तृणमूलचे नेते आणि राज्यमंत्री शशी पांजा यांनी विजय दशमीच्या दिवशीच मलिक यांच्या निवासस्थानांवर टाकलेल्या छाप्यांवर टीका करताना म्हटले की, "हा बंगालच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे. सुडाचे राजकारण सुरू आहे. "

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे, भाजप नेते राहुल सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेस भ्रष्टाचारात बुडाल्याचा आरोप केला. सिन्हा म्हणाले, "तृणमूलच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. जेव्हाही ईडी किंवा सीबीआय तृणमूल नेत्यांच्या निवासस्थानांवर छापे टाकतात तेव्हा ते चुकीचे आणि राजकीय हेतूने प्रेरित कारवाई आहे असे म्हणतात. मात्र, खरंतर तृणमूलचे अनेक नेते भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत."

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com