Sudhanshu Trivedi: कॅप्टन स्मित मच्छारच्या पराक्रमावर गांधी घराणे गप्प का, भाजपचा काँग्रेसला सवाल

BJP questioned Congress over its response to Captain Smith Machchar: फ्लायदुबई विमान प्रकरणातील कॅप्टन स्मित मच्छार यांच्या धाडसाचे जगभरातून कौतुक होत असताना, काँग्रेस नेतृत्वाच्या प्रतिक्रियेवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत.
Sudhanshu Trivedi
Sudhanshu TrivediSarkarnama
Published on: 
Updated on: 

Flydubai incident: दुबईवरुन इस्रायलकडे जाणाऱ्या फ्लाय दुबई FZ1067 या विमानाला कोसळवण्याचा प्रयत्न भारतीय पायलट कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी हाणून पाडला. त्यांच्यामुळे विमानातील १७४ जणांचा प्राण वाचला. जगभरातून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू, अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासहित इतर नेत्यांनी त्याच्या शौर्याचे कौतुक केले आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही फोनद्वारे त्यांचे कौतुक केले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी गांधी घराणे या पराक्रमावर अजून का गप्प आहे, असा सवाल केला.

जगभरातून कौतुक होत असताना काँग्रेस यावर शांत का अशा स्वरुपाची टीका भाजपकडून केली जात आहे. याअगोदर भाजपनेते गौरव भाटीया यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यातच आता सुधांशु त्रिवेदी यांनीही टीकेचा हा सुर कायम ठेवला आहे.

माध्यमांशी बोलताना भाजपचे सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, गांधी घराण्याच्या मौन भूमिकेमुळे अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात. कुटुंबाच्या राजमाता सोनिया गांधी यांच्या डोळ्यांत बाटला हाऊस चकमकीत मारल्या गेलेल्या आरोपींसाठी कधी अश्रू आले होते.मात्र, आता कॅप्टन स्मित यांच्या शौर्याबद्दल संवेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्याकडे एक शब्दही नाही. पॅलेस्टिनी मुद्द्याची झोळी घेऊन फिरणाऱ्या राजकुमारी (प्रियंका गांधी वाड्रा) यांना त्या झोळीतून सांत्वनाचा एक रुमालही काढता आला नाही.

Sudhanshu Trivedi
Rahul Gandhi news : राहुल गांधी खूप घाबरले होते, म्हणून..! लोकसभा निवडणुकीबाबत मित्रपक्षाच्या खासदाराच्या धक्कादायक दाव्याने काँग्रेस बॅकफुटवर

विरोधी पक्षनेते राहुल गांधीवर टीका करताना त्रिवेदी म्हणाले,गांधी कुटुंबाचे राजकुमार राहुल गांधी हे कधीकाळी गाझामधील परिस्थितीबद्दल व्यथित होत होते. मात्र,आता ते आपल्या ‘व्होट बँके’च्या दबावामुळे स्मित मच्छार यांच्या अदम्य धैर्याचे कौतुक करण्यासाठी एक शब्दही बोलू शकत नाहीत. या मुद्द्यावर काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाने स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणीही सुधांशू त्रिवेदी यांनी केली.

Sudhanshu Trivedi
Aaditya Thackeray news : ठाकरे बंधूंची 'गर्जना', पण आमदार आदित्य यांची पाठ, एकच पोस्ट अन् चर्चांना आले उधाण

कोण आहेत कॅप्टन स्मित मच्छार

स्मित मच्छार हे मूळचे मुंबईचे आहेत. त्यांचे आई-वडील गीताबेन आणि उपेंद्रकुमार मच्छार हे घाटकोपर येथे राहतात. कामामुळे ते सध्या दुबई येथे राहत आहेत. फ्लायदुबईमध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी मुंबईत स्पाईसजेटमध्ये ११ वर्षे काम केले आहे. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवसाय प्रशासनात त्यांनी पदवी घेतली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com