Rahul Gandhi news : राहुल गांधी खूप घाबरले होते, म्हणून..! लोकसभा निवडणुकीबाबत मित्रपक्षाच्या खासदाराच्या धक्कादायक दाव्याने काँग्रेस बॅकफुटवर

Shivpal Singh Patel, Rahul Gandhi Amethi, Raebareli, Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीत सपाने काँग्रेसच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली. पक्षाला ३७ जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Uttar Pradesh political news : उत्तर प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपसह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. सपा आणि काँग्रेसची आघाडी होणार असली तरी जागावाटपावरून दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. त्यातच सपाच्या एका ज्येष्ठ खासदाराने मोठा दावा करत काँग्रेसला बॅकफुटवर नेण्याचा प्रयत्न केला आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार शिवपाल सिंह पटेल यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत धक्कादायक दावा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीआधी राहुल गांधी खूप घाबरले होते. आपल्या पारंपरिक अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते तयार नव्हते. रायबरेलीबाबतही ते घाबरले होते.

समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत आघाडी केली नसती तर उत्तर प्रदेशात काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळाला नसता, असे पटेल म्हणाले आहेत. काँग्रेसच्या राज्यातील स्थितीमुळे राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढण्याबाबत उत्सुक नव्हते. त्यामुळेच त्यांनी रायबरेलीतून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला, असा दावा पटेल यांनी केला आहे.

Rahul Gandhi
संसदेत एकही दिवस न जाताच खासदारकीचा राजीनामा, आता 'या' महिला नेत्याची भाजपला भुरळ

सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीच राहुल गांधी यांना निवडणूक लढण्याबाबत सांगितले. त्यावेळी अखिलेश यांनी स्पष्ट केले होते की, राहुल गांधी निवडणूक लढले नाही तर सपा आपला उमेदवार उतरवेल. त्यानंतर राहुल गांधी तयार झाले, असा दावा करत पटेल यांनी काँग्रेसला आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

Rahul Gandhi
भाजपला हादरा देणारा विरोधी पक्षाचा उमेदवार; अर्ज दाखल केल्यानंतर काही तासांतच मंत्र्यांसोबत

लोकसभा निवडणुकीत सपाने काँग्रेसच्या तुलनेत खूप चांगली कामगिरी केली. पक्षाला ३७ जागा मिळाल्या तर काँग्रेसला केवळ ६ जागा मिळाल्या आहेत. सपाचे मतदान काँग्रेसला झाले. विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष एकत्र आले तर दोघांनाही फायदा होईल. आघाडी झाली नाही तरी सपाला मोठे नुकसान होणार नाही, असेही पटेल यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com