शशिकलांचं 'कमबॅक' अन् तमिळनाडूचे माजी आरोग्यमंत्री अडचणीत

शशिकलांनी आता कमबॅक केले आहे. अण्णाद्रमुकच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी स्वत:ला पक्षाचे सरचिटणीस घोषित केले आहे.
V.K.Sasikala
V.K.Sasikala
Published on
Updated on

चेन्नई : तमिळनाडूच्या (Tamil Nadu) माजी मुख्यमंत्री जयललिला (Jayalalithaa) यांच्या निकटवर्ती सहकारी व्ही.के.शशिकला (V.K.Sasikala) यांनी राजकारणासह सार्वजनिक जीवनातून निवृत्ती घेतली आहे. परंतु, शशिकलांनी आता कमबॅक केले आहे. अण्णाद्रमुकच्या (AIADMK) सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी स्वत:ला पक्षाचे सरचिटणीस घोषित केले आहे. याचवेळी अण्णाद्रमुकचे नेते व माजी आरोग्यमंत्री सी.विजयभास्कर हे अडचणीत आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

विजयभास्कर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरुद्ध दक्षता व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. विजयथभास्कर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांवर 50 ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात 23.85 लाख रूपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या छाप्याच्या वेळेबद्दल आता प्रश्नतचिन्ह उपस्थित केले जात आहे. शशिकला पुन्हा सक्रिय झाल्यानंतर हे छापे पडल्याने त्याच्याशी संबंध जोडला जात आहे.

दक्षता व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात 23 लाख 85 हजार 700 रुपयांची रोकड सापडली आहे. याचबरोबर 4.87 किलो सोने, 120 गाड्यांची आरसी बुक आणि इतर मालमत्तांची कागदपत्रे सापडली आहेत. याचबरोबर 10 हार्ड डिस्कही जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

V.K.Sasikala
दिवाळी होणार गोड! पेट्रोल, डिझेल स्वस्त होण्याची शक्यता

जयललिता या पुन्हा एकदा पक्ष ताब्यात घेण्याच्या दिशेने पावले टाकत आहेत. त्यांना पक्षातून मिळणारा पाठिंबा वाढू लागला आहे. यातच आज त्यांनी एकप्रकार शक्तिप्रदर्शन करीत कमबॅकचे संकेत दिले आहेत. पक्षाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी पभाचे संस्थापक व माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रन यांच्या स्मारकाच्या ठिकाणी पक्षाचा ध्वज फडकावला. तेथे एका कोनशिलेचे अनावरणही शशिकलांनी केले असून, त्यावर त्यांचा उल्लेख पक्षाच्या सरचिटणीस असा करण्यात आला आहे. यातून त्यांनी माजी मुख्यमंत्री ओ.पनीरसेल्वम आणि के.पलानीस्वामी या दोन्ही गटांना इशारा दिल्याचे मानले जात आहे.

V.K.Sasikala
मुख्यमंत्र्यांनी महिन्यातच शब्द खरा करुन दाखवला अन् केली विजबिलांची होळी!

विशेष म्हणजे अण्णाद्रमुक पक्षाचा सुवर्णमहोत्सव साजरा होण्याच्या एक दिवस आधी आधीच अण्णाद्रमुकचा ध्वज लावलेल्या मोटारीतून शशिकला या मरिना बीचवर पोचल्या होत्या. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. त्यांना जयललितांसोबत माजी मुख्यमंत्री एम.जी.रामचंद्रमन आणि अण्णादुराई यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अण्णाद्रमुकचे कार्यकर्ते उपस्थित होते. शशिकला या पुन्हा राजकारणात सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांना दिले होते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शशिकला यांनी 3 मार्चला राजकारणातून निवृत्ती घेतली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com