

दहावी-बारावी २०२७ बोर्ड परीक्षेसाठी CBSEने सॅम्पल पेपर जाहीर केले.
विषयानुसार सॅम्पल पेपर आणि मार्किंग स्कीम PDF उपलब्ध.
सरावातून प्रश्नरचना, वेळेचे नियोजन आणि उत्तरलेखनाची तयारी करता येणार.
CBSE Board Exam 2027 News: इयत्ता १० वी आणि १२ वीच्या बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विषयनिहाय सॅम्पल प्रश्नपत्रिका आणि मार्किंग स्कीम उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिकेची रचना आणि उत्तरलेखनाचा सराव करता येणार आहे.
सीबीएसईने इयत्ता १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वेबपेजवरसॅम्पल प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन दिल्या आहेत. विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपल्या वर्गानुसार आणि विषयानुसार संबंधित पीडीएफ डाउनलोड करू शकतात.
इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र यांसह विविध विषयांचे सॅम्पल पेपर उपलब्ध आहेत. मात्र, विषयांची उपलब्धता दोन्ही वर्गांसाठी वेगवेगळी असल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासक्रमानुसार कागदपत्रे निवडणे आवश्यक आहे.
सॅम्पल पेपरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वातावरणाचा सराव करता येईल. ठराविक वेळेत संपूर्ण प्रश्नपत्रिका सोडवल्यामुळे वेळेचे नियोजन कितपत योग्य आहे, याचीही कल्पना येईल. त्याचबरोबर कोणत्या विषयातील किंवा घटकातील तयारी कमी आहे, हे विद्यार्थ्यांना स्वतः तपासता येणार आहे.
या तयारीसोबतच मार्किंग स्कीम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासाठी कोणते मुद्दे अपेक्षित आहेत आणि त्यानुसार गुणांचे विभाजन कसे केले जाते, हे त्यातून समजते. सॅम्पल पेपर सोडवल्यानंतर मार्किंग स्कीमच्या आधारे स्वतःच्या उत्तरांचे मूल्यमापन करून चुका सुधारण्याचा सराव विद्यार्थ्यांना करता येईल.
२०२७ च्या बोर्ड परीक्षांचे विषयनिहाय वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. २१ सप्टेंबर २०२६ पर्यंत सीबीएसईकडून अधिकृत टाइमटेबल प्रसिद्ध झालेले नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी सोशल मीडिया किंवा इतर अनधिकृत माध्यमांवरील माहितीकडे दुर्लक्ष करून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांवरच विश्वास ठेवावा. नियमित सराव, वेळेचे नियोजन आणि अवघड घटकांची पुनरावृत्ती करून बोर्ड परीक्षेची तयारी अधिक प्रभावीपणे करता येणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.