Teacher Salary: मोठी बातमी! शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार 'या' तारखेलाच बँक खात्यात जमा होणार; सरकारचा आदेश

Maharashtra Government Teacher Salary News: महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांनी विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Maharashtra Government Teacher Salary News
Maharashtra Government Teacher Salary News AI
Published on
Updated on

Pune News: शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आता महिनाअखेरीची प्रतीक्षा करण्याची वेळ येणार नाही. अशासकीय अनुदानित कला, वाणिज्य, विज्ञान, विधी व समाजकार्य महाविद्यालये तसेच अकृषी विद्यापीठांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन प्रत्येक महिन्याच्या १ तारखेलाच करण्याचे आदेश उच्च शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यामुळे वेतनास होणाऱ्या विलंबाला आळा बसण्याची शक्यता आहे.

नियमित वेतनासोबतच तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन, अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या अदायगीसाठी आवश्यक असलेली अनुदान मागणी दर महिन्याच्या २० तारखेपर्यंत संचालनालयाकडे सादर करावी, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर विहित वेळेत बीडीएस प्रणालीवर आवश्यक निधी उपलब्ध करून देणे सुलभ होणार आहे.

वेतन लांबण्याची शक्यता कमी

महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत होण्यासाठी आता कार्यालय प्रमुखांनी विशेष दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे निधीची मागणी वेळेत न करणे किंवा प्रशासकीय प्रक्रियेत विलंब होणे, यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन लांबण्याची शक्यता कमी होणार आहे.

Maharashtra Government Teacher Salary News
Teachers EKYC: शिक्षकांसाठी मोठी बातमी! ई-केवायसीसाठी 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ; न केल्यास ऑक्टोबरचा पगार रोखणार!

तासिका तत्त्वावरील अध्यापकांचे मानधन अदा केल्यानंतर त्याचा तपशील गोषवाऱ्यासह महाविद्यालयनिहाय संचालनालयाकडे दरमहा सादर करावा लागणार आहे. त्यामुळे मानधनाच्या अदायगी प्रक्रियेतही नियमितता आणि पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Maharashtra Government Teacher Salary News
Teacher Recruitment : ​शिक्षक भरतीत महिलांना मोठी संधी; तब्बल 13 हजार पदांची शिफारस यादी जाहीर!

मोघम मागणीला लगाम

अर्जित रजा रोखीकरण आणि वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठीची अनुदान मागणी करताना केवळ मोघम मागणी करता येणार नाही. संबंधित मागणीसोबत मंजुरी आदेश जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे निधीच्या मागणीपासून प्रत्यक्ष अदायी पर्यंतची प्रक्रिया अधिक स्पष्ट राहणार असून, त्याचे लेखापरीक्षणही सुलभ होणार आहे.

जबाबदारी निश्चित

उच्च शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे अनुदानित महाविद्यालये आणि अकृषी विद्यापीठांमधील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना महिन्याच्या सुरुवातीलाच वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता १ तारखेला वेतन करण्याची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनावर निश्चित झाल्याने त्याची अंमलबजावणी किती काटेकोरपणे होते, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com