DA hike Latest News : केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या खात्यात आता 'एक्स्ट्रा' पैसे! 2 टक्के डीए वाढीवर शिक्कामोर्तब; अक्षय्य तृतीयेचं खास गिफ्ट!

2 percent DA increase latest news India : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढ मंजूर. अक्षय्य तृतीयेच्या आधी खात्यात अतिरिक्त रक्कम जमा होणार, पगारावर काय परिणाम होईल ते जाणून घ्या.
Central government employees DA hike 2026
Central government employees DA hike 2026Sarkarnama
Published on
Updated on

केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी यंदाची अक्षय्य तृतीया खास ठरली आहे. केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ जाहीर करत कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे सध्याचा महागाई भत्ता 58 टक्क्यांवरून थेट 60 टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. देशातील सुमारे 5 दशलक्ष कर्मचारी आणि 6.5 दशलक्ष निवृत्तीवेतनधारकांना या निर्णयाचा थेट फायदा होणार आहे.

महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांच्या खर्चातही सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे महागाई भत्ता वाढवण्याची मागणी गेल्या काही महिन्यांपासून होत होती. अखेर केंद्रीय मंत्रिमंडळाने यावर शिक्कामोर्तब करत कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा दिला. जानेवारीपासून लागू होणारी ही वाढ यावेळी थोड्या उशिराने जाहीर झाली असली, तरी एप्रिल महिन्यात हा निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांना एकप्रकारे सणाची भेट मिळाली आहे.

Central government employees DA hike 2026
Vidhan Parishad Maharashtra politics : विधान परिषदेत ठाकरे गटाची नवी खेळी; उद्धव ठाकरे यांच्या जागी 'या' दोन नेत्यांची नावे आघाडीवर!

निवृत्तीवेतनधारकांनाही या निर्णयाचा फायदा होणार असून त्यांना महागाई सवलत म्हणजेच डीआरमध्ये वाढ मिळेल. त्यामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होऊन वाढत्या महागाईचा ताण काही प्रमाणात कमी होईल.

याशिवाय केंद्र सरकारने आणखी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. भारतीय जहाजांना स्वस्त आणि सुरक्षित विमा सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी 13000 कोटी रुपयांच्या निधीसह सार्वभौम सागरी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील रस्ते विकासाला चालना देण्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना 2028 पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी 3000 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.

Central government employees DA hike 2026
Amravati ayan ahmed video scandal : 'लव्ह गुरू'च्या टिप्स वापरून मुलींना अडकवत होता जाळ्यात; अमरावती प्रकरणातील धक्कादायक खुलासे

दरम्यान, आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर कर्मचारी संघटनांनी विविध मागण्या मांडल्या आहेत. वेतन रचनेत बदल करून फिटमेंट फॅक्टर 3.83 ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. ही मागणी मान्य झाल्यास किमान मूळ वेतन 18000 रुपयांवरून सुमारे 69000 रुपयांपर्यंत जाऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com