Chennai SBI branch : धक्कादायक! माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची SBI मॅनेजरला मारहाण, VIDEO व्हायरल

SBI Manager Slap Case : पोलिसांसांच्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी ही घटना घडली. इमारतीतील खराब झालेल्या लिफ्टच्या दुरुस्तीबाबत चर्चा करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्र्याची मुलगीबँक मॅनेजर हरशीन सिंग यांना भेटण्यासाठी आली होती.
SBI Manager Slap Case | Kayalvizhi Alagiri | Chennai
CCTV footage shows Kayalvizhi Alagiri during an alleged altercation with an SBI branch manager at the Adyar branch in Chennai. The SBI manager slap case has sparked widespread discussion on social media.Sarkarnama
Published on
Updated on

Chennai news, 26 Jul : चैन्नईतील स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या आद्यार शाखेतील एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये चक्क बँक मॅनेजरला माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीने थप्पड मारल्याचं पाहायला मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँक मॅनेजरच्या कानशिलात मारणारी आरोपी ही माजी केंद्रीय मंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK)चे नेते एम. के. अलागिरी यांची मुलगी कायलविझी अलागिरी असल्याचे समोर आले आहे. ही संपूर्ण घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पोलिसांसांच्या माहितीनुसार, 21 जुलै रोजी ही घटना घडली. इमारतीतील खराब झालेल्या लिफ्टच्या दुरुस्तीबाबत चर्चा करण्यासाठी कायलविझी अलागिरी या बँक मॅनेजर हरशीन सिंग यांना भेटण्यासाठी आल्या होत्या.

ज्या व्यावसायिक इमारतीत SBIची शाखा आहे, त्या इमारतीच्या मालक कायलविझी अलागिरी आहेत. लिफ्टच्या दुरुस्तीच्या मुद्द्यावरून बँक मॅनेजरच्या आणि त्यांच्यात वाद झाला. हा वाद वाढल्यानंतर संतापाच्या भरात कायलविझी अलागिरी यांनी थेट बँक मॅनेजरला थप्पड मारली.

SBI Manager Slap Case | Kayalvizhi Alagiri | Chennai
Pune Police Transfers : पुण्यातील गोळीबार प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांना भोवलं; आयुक्तांचा मोठा निर्णय, एका झटक्यात 'त्या' 6 निरीक्षकांच्या बदल्या

सीसीटीव्हीमध्ये नेमकं काय?

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कायलविझी अलागिरी बँक मॅनेजरसोबत बसलेल्या दिसत आहेत. दोघांमध्ये शाब्दीक वाद सुरू असतानाच त्या अचानक उठतात आणि मॅनेजरला थप्पड मारतात. या घटनेनंतर बँकेचे मुख्य व्यवस्थापक नामाचिवायम यांनी आद्यार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

SBI Manager Slap Case | Kayalvizhi Alagiri | Chennai
BJP Politics : चक्क CM फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला भाजप कार्यकर्त्याकडूनच धमकी; राजकारण पेटल्यानंतर माजी आमदाराकडून दिलगिरी व्यक्त

पोलिसांनी कायलविझी अलागिरी यांच्याविरुद्ध चार कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यानंतर अनेकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com