BJP Politics : चक्क CM फडणवीसांच्या जवळच्या आमदाराला भाजप कार्यकर्त्याकडूनच धमकी; राजकारण पेटल्यानंतर माजी आमदाराकडून दिलगिरी व्यक्त

Kolhapur BJP Internal Row : 'आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्या बाबत बोलू नये. बोलण्याचे धाडस केले तर आमदार शिवाजीराव पाटील यांना कोगनोळी नाका ओलांडू देणार नाही', असा इशारा घाटगे यांचे कार्यकर्ते धनराज घाटगे यांनी दिला.
BJP internal Politics
Former MLA Sanjay Ghatge issued an apology after a viral video by his supporter intensified the BJP internal dispute in Kolhapur. The controversy erupted over remarks linked to Hasan Mushrif and the Annapurna project.Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 26 Jul : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीतून सुरू झालेला महायुतीतील अंतर्गत वाद हा आता भाजपमधील अंतर्गत वादाचा मुद्दा बनलाय. चंदगडचे भाजपचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्या अन्नपूर्णा कंपनीला कर्ज दिल्या प्रकरणी जिल्हा बँकेला झालेल्या 13 लाखाच्या दंडावरून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली.

ही टीका भाजपचे नेते माजी आमदार संजय घाटगे यांच्या कार्यकर्त्यांना चांगलीच जिव्हारी लागली. भाजपच्या कार्यकर्त्यांकडूनच आमदारांना थेट टार्गेट केल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्याचे पडसाद शनिवारी दिवसभर उमटले. आमदार शिवाजीराव पाटील यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्या बाबत बोलू नये.

बोलण्याचे धाडस केले तर आमदार शिवाजीराव पाटील यांना कोगनोळी नाका ओलांडू देणार नाही, असा इशारा घाटगे यांचे कार्यकर्ते धनराज घाटगे यांनी दिला. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर कागलमधील राजकीय वातावरण तापल्याने शनिवारी दिवसभर भाजपमधील अंतर्गत वादाचे पडसाद उमटले. अखेर घाटगे यांनी समाज माध्यमांमध्ये व्हायरल केलेला व्हिडिओ डिलिट केला. त्याबद्दल माजी आमदार संजय घाटगे यांनी दिलगिरी व्यक्त करत या प्रकरणावर पडदा टाकला.

BJP internal Politics
Mule Account : 'फक्त खाते वापरायला द्या, कमिशन मिळेल' म्हणत जाळ्यात; अहिल्यानगरात 12 जणांवर गुन्हे, 40.68 लाखांची सायबर फसवणूक उघड

व्हायरल झालेल्या व्हिडिओत धनराज घाटगे म्हणाले की, संजय घाटगे यांनी अन्नपूर्णा कारखाना उभारणीचा संकल्प केला. सामान्य शेतकऱ्यांनी कोट्यवधी रुपये जमा केले. मंत्री मुश्रीफ व दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या सहकार्यातून जिल्हा बँकेने प्रकल्पाला कर्ज दिले. पण, याबाबत आमदार पाटील यांनी टीका केली. आतापर्यंत आमदार पाटील यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे, आता घाटगे यांच्याबद्दल ते बोलत आहेत.

BJP internal Politics
Pune Police Transfers : पुण्यातील गोळीबार प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांना भोवलं; आयुक्तांचा मोठा निर्णय, एका झटक्यात 'त्या' 6 निरीक्षकांच्या बदल्या

त्यामुळे पुन्हा टीका केली तर घाटगे गटाचे कार्यकर्ते तुम्हाला कोगनोळी नाका ओलांडू देणार नाहीत हे लक्षात ठेवा. दरम्यान धनराज घाटगे यांनी हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत आमदार शिवाजीराव पाटील यांना थेट इशारा वजा धमकी दिल्याचा प्रकार असल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू होते.

त्यामुळे भाजपमधील अंतर्गत राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. त्यानंतर संजय घाटगे यांनी सोशल मीडियातून दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले, आमदार शिवाजीराव पाटील हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल आमच्या कार्यकर्त्यांनी केलेले वक्तव्य ऐकून दुःख झाले. आमदार पाटील यांनी माझ्याबद्दल अनुद्गार काढले नसताना गैर समजुतीतून सोशल मीडियातून व्हिडीओ व्हायरल झाला. त्याबद्दल आपण दिलगिरी व्यक्त करतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com