Pune Police Transfers : पुण्यातील गोळीबार प्रकरण पोलीस अधिकाऱ्यांना भोवलं; आयुक्तांचा मोठा निर्णय, एका झटक्यात 'त्या' 6 निरीक्षकांच्या बदल्या

Pune law and order : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गोळीबारांच्या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेत पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.
Pune Firing | Police Transfers | Amitesh Kumar
Pune Firing | Police Transfers | Amitesh KumarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 26 Jul : पुण्याच्या मध्यवर्ती भागात घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भर दिवसा पोलीस चौकीसमोरच गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

याच पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनांची अत्यंत गंभीर दखल घेत पोलीस दलात मोठे प्रशासकीय फेरबदल केले आहेत. खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यासह एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काढलेल्या आदेशानुसार, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत भरत चव्हाण यांची तात्पुरती बदली पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष येथे करण्यात आली आहे. तसेच गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक अजित महादेव जाधव यांनाही नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे.

दरम्यान, वाहतूक शाखेतील पोलीस निरीक्षक धनंजय विठ्ठल पिंगळे यांची खडक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन गोळीबाराच्या घटनांनंतर पोलिसांच्या कामगिरीवर टीका होत होती.

Pune Firing | Police Transfers | Amitesh Kumar
Akola Crime : अपघात की हत्या? शिवसेना नेत्याच्या मृत्यूला धक्कादायक वळण, कुटुंबियांचा माजी जिल्हाप्रमुखावरच गंभीर आरोप

भरदिवसा घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले होते. त्यानंतर पोलिस आयुक्तांनी परिस्थितीचा आढावा घेत जबाबदारी निश्चित करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रशासकीय कारवाई केली.

Pune Firing | Police Transfers | Amitesh Kumar
Mohan Bhagwat: हिंदू देवतांची माहिती आता शालेय पाठ्यपुस्तकांतून दिसणार? मोहन भागवातांनी नेमकी काय केलीए मागणी?

या आदेशानुसार एकूण सहा पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे पुणे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, पुढील काळात अशा घटनांवर अधिक कडक पद्धतीने नियंत्रण ठेवण्याचे संकेत मिळत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com