CJP Delhi Protest : अभिजीत दिपकेंच्या अटकेनंतर दिल्लीत धरपकड! पोलिसांनी जंतर-मंतरवर जाणाऱ्या 3 माजी मुख्यमंत्र्यांना उचललं; नेत्यांना घेतलं ताब्यात

Delhi Protest Against Gyanesh Kumar : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीसह देशातील विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे.
Protest Against Chief Election Commissioner Gyanesh Kumar; Abhijeet Dipke
Protest Against Chief Election Commissioner Gyanesh Kumar; Abhijeet DipkeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Delhi News : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेससह देशातील विरोधी पक्ष आक्रमक झाले असून, त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलने केली जात आहेत. दरम्यान, आज दिल्लीतही या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि इतर विरोधी पक्षांनी जोरदार आंदोलनाची घोषणा केली होती.

मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसेच, आंदोलनासाठी जंतर-मंतरकडे जाणाऱ्या तीन माजी मुख्यमंत्र्यांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. या कारवाईमुळे राजकीय वातावरण तापले असून, केंद्र सरकारविरोधात विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेसने देशभरात आवाज उठवला आहे. आता याच मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीसह इतर विरोधी पक्षही एकत्र आले आहेत. या आंदोलनात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन CJP तर्फे करण्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर पक्षाने दिल्लीत आंदोलनाची हाक दिली होती. त्यानंतर दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

Protest Against Chief Election Commissioner Gyanesh Kumar; Abhijeet Dipke
CJP Delhi Protest: आता अजिंक्य शिंदे करणार CJPच्या आंदोलनाचं नेतृत्व! अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. जवळपास ३५ हजार पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांना तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. एका बाजूला दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाला अधिकृत परवानगी नाकारली असल्याचे सांगितले जात आहे, तर दुसरीकडे आंदोलक जंतर-मंतरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. यामुळे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJPचे संस्थापक अभिजीत दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना विमानातूनच ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यानंतर या आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे करतील, अशी घोषणा अभिजीत दीपके यांनी केल्याची माहिती आहे. दरम्यान, या आंदोलनात अनेक राजकीय नेतेही सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे.

अभिजीत दिपके यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर आता तीन राज्यांच्या माजी मुख्यमंत्र्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानाबाहेर पोलिसांनी आणि CRPFच्या जवानांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, माजी खासदार साकेत गोखले यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अन्य पाच नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे.

Protest Against Chief Election Commissioner Gyanesh Kumar; Abhijeet Dipke
CJP Delhi Protest: "माशीला मारायला हातोड्याची काय गरज?" सुप्रीम कोर्टाची टिप्पणी; सीजेपीच्या आंदोलनावेळी रेल्वे, मेट्रो सेवा बंद न ठेवण्याचे कोर्टाचे निर्देश

दुसरीकडे, दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही जंतर-मंतरकडे जाण्यापूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया हेही त्यांच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. तसेच, केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दरम्यान, मुंबईतही महात्मा गांधी यांचे नातू तुषार गांधी यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांना डी. एन. नगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com