Supreme Court: अविश्वास प्रस्ताव दाखल असताना उपाध्यक्षांनी स्वत:च त्यावर निर्णय घेणे, योग्य नाही...

Supreme Court Hearing: महाविकास आघाडी स्थापन होताच आघाडीमध्ये असंतोष व विभाजन सुरू झाले होते.
Supreme Court Live Streaming
Supreme Court Live StreamingSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: राज्याच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाकडून ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी आपल्या युक्तीवादात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यांच्यानंतर आता ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांनी युक्तीवाद केला.

कौल यांच्यानंतर महेश जेठमलानी यांचा युक्तीवाद सुरु झाला आहे. जेठमलानी म्हणाले, ठाकरे गटाच्या वतीने दोन प्रमुख मागण्या आहेत. पहिली म्हणजे, बंडखोर आमदारांना अपात्र करा. दुसरी म्हणजे शिंदेंच्या सत्तास्थापनेची पूर्ण प्रक्रिया मागे घ्या. महाविकास आघाडी स्थापन होताच आघाडीमध्ये असंतोष व विभाजन सुरू झाले होते. शिवसेनेचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत दीर्घकाळ वैचारिक मतभेत राहिले आहेत, असेही जेठमलानी यांनी सांगितले.

Supreme Court Live Streaming
Supreme Court hearing : शिंदे गटाच्या युक्तीवादावर, घटनापीठाचा महत्त्वाचा सवाल...

21जूनला मतभेद प्रत्यक्ष समोर आले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेता पदावरुन दूर केले. सत्तांतराच्या सर्व घटनाक्रम जेठमलानी यांनी न्यायालयात पुन्हा सांगितला. विधानसभेच्या उपाध्यक्षांविरोधात, अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर कारवाईचा अधिकार राहत नाही. विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यानंतर त्यांनी स्वत:च त्यावर निर्णय घेणे, हे न्यायसंगत नाही. येथे अधिकारांचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक आहे, असा युक्तीवाद जेठमलानी करत आहेत.

कौल आपल्या युक्तीवादात म्हणाले होते, राजकीय पक्षाचे अस्तित्व विधिमंडळ पक्षावर अवलंबून असते. वेगळा झालेला गट हाच खरा पक्ष आहे. निवडणूक आयोगानेही त्याला मान्यता दिली. खरा गटनेता कोण आहे? विधानसभा अध्यक्ष ठरवतील. मात्र, सर्वोच्च न्यायालयात जे अधिकारच नाहीत, ते ठरवण्यास सांगितले जात आहे.

Supreme Court Live Streaming
Supreme Court : शिंदे गटाच्या युक्तीवादावर घटनापीठाचा महत्त्वाचा सवाल;...राज्यपालांनी या आधी असे काही निर्णय घेतले का?

पक्षाचा गटनेता विधानसभा अध्यक्ष, राज्यपालांच्या संपर्कात असतो. त्याचे कामच ते असते. विधिमंडळात गटनेताच पक्षाचे प्रतिनिधित्व करत असतो. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्यपाल आणि विधानसभा अध्यक्ष या सर्व संवैधानिक संस्थांना बायपास करुन निर्णय रद्द करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. हे योग्य नसल्याचे, कौल म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com