CM wife in Assembly : मुख्यमंत्र्यांना पत्नीनेच आणलं अडचणीत; थेट विधानसभेत वाचला न झालेल्या कामांचा पाढा, व्हिडीओ व्हायरल...

Conrad Sangma Assembly news : पती-पत्नीमधील विधानसभेतील संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
Assembly
AssemblySarkarnama
Published on
Updated on

Indian democracy moment : विधिमंडळाच्या अधिवेशनात विरोधकांकडून मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांवर सातत्याने प्रश्नांची सरबत्ती केली जाते. विरोधकांकडून केलेल्या आरोपांना उत्तरे देताना अनेकदा मंत्र्यांना नाकीनऊ येते. पण मंगळवारी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या पत्नीनेच विधानसभेत अडचणीत आणले. विधिमंडळाच्या अधिवेशनात पती-पत्नीतील या संवादाची आता सर्वत्र चर्चा होत आहे.

मेघालय विधानसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात काल मुख्यमंत्री कोनराड के संगमा यांच्यावर त्यांच्या पत्नी मेहताब चंदी एक संगमा यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मेहताब या नॅशनल पीपल्स पार्टीच्य आमदार आहेत. तर मुख्यमंत्री हे या पक्षाचे प्रमुख आहेत. २०२३ मध्ये झालेल्या निवडणुकीत दोघेही निवडून आले आहेत.

मेहताब या शिक्षणासह विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रीय असतात. आज त्यांनी शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकल्पांना होत असलेल्या विलंबाबाबत मुख्यमंत्र्यांसमोरच प्रश्न उपस्थित करत जाब विचारला. प्रश्नोत्तराच्या तासांत मेहताब यांनी पशुवैद्यकीय महाविद्यालय, दोन मत्स महाविदयालये आणि एका डेअर महाविद्यालयाच्या कामांबाबत त्यांनी विचारणा केली. २०२२ मध्ये मंत्रिमंडळाने या महाविद्यालयांना मंजुरी दिली होती.

Assembly
BMC budget update : फडणवीस ठाकरेंना म्हणाले होते, रिसीट चाटायच्यात का? सत्ताबदल होताच नाकावर टिच्चून घेतला सर्वात मोठा निर्णय...

राज्यातील पशुवैद्यकीय प्रशिक्षण केंद्रांवर कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचा मुद्दाही उपस्थित केला. तसेच राज्य सरकार हे प्रश्न सोडविण्यासाठी कोणती पावले उचलणार, याबाबत त्यांनी सवाल केला. या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी उत्तरे दिली. प्रस्तावित महाविद्यालये लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यांनी कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याचेही मान्य केले. प्राधान्यक्रमाने रिक्त जागांवर भरती केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Assembly
Maharashtra Government : कर्मचाऱ्यांसाठी मोठी निर्णय; भत्ता वाढला, रोखीने मिळणार थकबाकी

दरम्यान, पती-पत्नीमधील विधानसभेतील संवादाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. दोघांनीही संसदीय मर्यादेचे पालन करत विधानसभा अध्यक्षांकडे पाहूनच आपले म्हणणे मांडले. मुख्यमंत्र्यांनीही पत्नीने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गंभीरपणे उत्तरे दिली. मात्र, विधानसभेमध्ये असा प्रसंग क्वचितच पाहायला मिळतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com