INDIA Bloc News : एसआयआर प्रकरणावरून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाला आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयातून मोठा धक्का बसला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी आणि 'इंडिया' आघाडीच्या नेत्यांना भेटण्यास थेट नकार दिला आहे.
एसआयआर संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी सरन्यायाधीशांकडे वेळेची मागणी केली होती. मात्र, सरन्यायाधीशांनी ईमेलद्वारे उत्तर पाठवत हा प्रस्ताव तात्काळ फेटाळून लावला.
राहुल गांधी यांचा प्रस्ताव फेटाळताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी घटनात्मक चौकटीची आठवण करून दिली. त्यांनी ईमेलमध्ये नमूद केले की, विरोधी पक्षनेते ज्या मुद्द्यांवर चर्चा करू इच्छित आहेत, ते विषय आधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
संविधानिक प्रणालीनुसार सर्वोच्च न्यायालय कोणत्याही परिस्थितीत कार्यकारी मंडळाच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप करू शकत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना कोणत्याही मुद्द्यावर कायदेशीर आणि न्यायालयीन दाद मागण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. ते नियमानुसार याचिका दाखल करू शकतात आणि मंगळवारी एसआयआर संदर्भातील सुनावणीदरम्यान त्यावर विचार केला जाऊ शकतो,असे देखील त्यांनी म्हटले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात काँग्रेस आणि 'इंडिया' आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी राष्ट्रपती भवनावर मोर्चा काढल्यानंतर, सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढण्याची आणि सरन्यायाधीशांना एसआयआर रद्द करण्यासह निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याचे निवेदन सोपवण्याची घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. मात्र, आता प्रत्यक्ष भेटीचा प्रस्तावच सरन्यायाधीशांनी फेटाळल्यामुळे विरोधी पक्षाच्या या रणनीतीला मोठा झटका बसल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.