Police Lathi Charge : जंतर मंतरवर पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज; मोर्चा काढण्यावर अभिजीत दीपके ठाम!

Police lathi charge at Jantar Mantar protest : आंदोलकांवरील लाठीचार्ज नंतर आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. सरकारवर टीका करत ते म्हणाले, किती ही भ्याड राजवट.
Jantar Mantar protesters face police lathi charge
Jantar Mantar protesters face police lathi chargeSarkarnama
Published on
Updated on

Jantar Mantar protest latest updates: पोलिसांकडून मोर्चा काढण्याच्या तयारीत असलेल्या जंतर मंतरवरील आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला .त्यामुळे पोलिस आणि आंदोलकांमध्ये चकमक उठाली.

500 हजार पोलिस या मोर्चासाठी तैनात करण्यात आले होते. दरम्यान, काही तरुणांना आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापासून रोखण्यात येत होते त्यामुळे संताप व्यक्त केला जात होता. लाठीचार्जमुळे आंदोलक संतप्त झाले होते. अभिजीत दीपके देखील मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

आंदोलकांवरील लाठीचार्ज नंतर आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली. ते म्हणाले, किती ही भ्याड राजवट. परीक्षेचे पेपर फुटल्याप्रकरणी न्यायाची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या पाठीशी उभे राहणाऱ्यांवर क्रूर बळाचा वापर केला जात आहे.

तर, संजय राऊत यांनी देखील सरकार घाबरले आहेत, अशी टीका केली. ते म्हणाले, 'सरकार पोरांना घाबरलेय. शुद्ध मराठीत सांगायचे तर ५६ इंच वाल्यांची हातभार फाटली. डरो मत! संसदेवरील मार्चला परवानगी नाकारली; शक्य असते तर जंतर मंतर वरील लाखो लोकांना ED लावली असती;पण ते कठीण आहे.मोर्चाचा मार्ग ED च्या दिशेने वळवायला हवा! Ed,सुप्रीम कोर्ट या सारख्या संस्था मोदी शहांच्या गुलाम झाल्या आहेत.'

Jantar Mantar protesters face police lathi charge
Abhijit Deepke Warning : संसदेकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, अभिजीत दीपके प्रचंड आक्रमक

दिल्लीतील जंतर मंतरवरून अवघ्या काही वेळात संसदेवर मोर्चा निघणार आहे. या मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. केरळ भवनच्या जवळ हा मोर्चा अडवण्याचा पोलिसांची तयारी आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या अभिजित दिपके यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, 'जंतर-मंतरकडे जाणारे चारही रस्ते लोकांनी पूर्णपणे भरले आहेत. आम्हाला संसदेकडे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.',

Jantar Mantar protesters face police lathi charge
Parliament March : "मी आजच उपोषण सोडायला तयार..."; संसदेवरील मोर्चापूर्वीच सोनम वांगचुक यांची उपोषण मागे घेण्याची तयारी; सरकारसमोर ठेवल्या 'या' 3 अटी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com