Central KYC : आर्थिक व्यवहार होणार अधिक सोपे; बँक, विमा, म्युच्युअल फंडांसाठी एकच KYC? CKYC 2.0 मध्ये काय बदलणार?

One-Time Digital KYC to Simplify Banking, Insurance and Mutual Fund Services : CKYC 2.0 अंतर्गत प्रत्येक ग्राहकाला मिळणार Common Customer ID; OTPद्वारे काही मिनिटांत पूर्ण होणार KYC, बँका, विमा कंपन्या आणि म्युच्युअल फंड एकाच प्रणालीशी जोडले जाणार.
Central KYC
Central KYCSarkarnama
Published on
Updated on

Common Customer ID for Banking : ग्राहकांना वेगवेगळ्या बँका, विमा योजना, म्युच्युल फंड इत्यादि संबंधी आर्थिक व्यवहारांसाठी प्रत्येक वेळी स्वतंत्र केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही कधी नवीन बँक अकाउंट उघडायला, इन्शुरन्स (Insurance) घ्यायला किंवा म्युच्युअल फंड (Mutual Fund) मध्ये गुंतवणूक करायला गेलात की, प्रत्येक वेळी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड (PAN Card), आधार कार्ड (Aadhaar) आणि फोटो द्यावे लागतात.

हीच प्रोसेस वारंवार करणे खूप कंटाळवाणे असते. काही बँका केवायसी न केल्यास खाते परस्पर बंद करून टाकतात. मात्र लवकरच सेंट्रल केवायसी 2.0 (CKYC) अंतर्गत एकच ग्राहक ओळख प्रणाली लागू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे ग्राहकांना दर वेळी वेगवेगळ्या आर्थिक संस्थांमध्ये खाते उघतडताना किंवा विमा पॉलिसी घेताना पुन्हा पुन्हा कागदपत्रे जमा करून केवायसी प्रक्रिया करावी लागणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अनेक युरोपीय देशांमध्ये अशी सेंट्रल केवायसी प्रणाली वापरली जाते. डिजिटल तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना सामायिक पडताळणी प्रक्रियेद्वारे वेगवेगळ्या आर्थिक सेवा-सुविधांचा सहज लाभ घेता येतो. त्याच धर्तीवर भारतात (India) देखील सामायिक ओळख प्रणाली विकसित करण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू आहेत. CKYC 2.0 ही एक अशी सिस्टीम आहे जिथे ग्राहकांची सर्व KYC माहिती एकाच सेंट्रल डेटाबेसमध्ये सेव्ह केली जाते. यामुळे ग्राहकांना वेगवेगळ्या फायनान्शियल कंपन्यांना वारंवार आयडी प्रूफ (ID Proof) देण्याची गरज पडत नाही.

सध्या बँकेत (Bank) गेल्यावर ते त्यांची वेगळी KYC करतात. शेअर मार्केटसाठी ब्रोकर वेगळी KYC करतो. पण CKYC 2.0 आल्यावर एकदाच डॉक्युमेंट्स द्यावे लागतील. या नवीन सिस्टीममध्ये प्रत्येक ग्राहकाचा एक ‘Common Customer ID’ तयार होईल. ग्राहक आर्थिक संस्थेत जाईल, तेव्हा ती कंपनी फक्त तुमच्या संमतीने (Consent) तुमची सर्व माहिती या सेंट्रल सिस्टीममधून घेईल. पुन्हा कागदपत्रे जमा करण्याची गरज राहणार नाही.

Central KYC
CJP News : सरन्यायाधीशांच्या एका वक्तव्याची मोठी किंमत : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा; मोदींच्या मंत्रिमंडळात 'झुरळांमुळे थयथयाट'

ही प्रोसेस एकदम सोपी आणि पूर्णपणे डिजिटल असणार आहे. उदाहरणार्थ ग्राहक एखाद्या नवीन बँकेत अकाउंट उघडायला गेल्यास बँक त्या ग्राहकाला CKYC माहिती वापरण्यासाठी एक OTP पाठवेल. ग्राहकाने OTP दिल्यावर, बँक सर्व व्हेरिफाय केलेली माहिती सेंट्रल सिस्टीममधून डायरेक्ट डाउनलोड करेल. कोणतेही फिजिकल डॉक्युमेंट्स देण्याची गरज पडणार नाही आणि काही मिनिटांत ग्राहकाचे काम होईल.

Central KYC
Dharmendra Pradhan Resignation : 'वी हॅव ** डन इट!' धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा अन् अभिजित दिपके यांचा मोदी सरकारला थेट टोला, 34 दिवसांच्या आंदोलनाला यश (Video)

प्रोटीन ई-गव टेक्नॉलॉजिस (Protean eGov Technologies) ही कंपनी ही प्रणाली तयार करत आहे. यात एक खास ‘कॉन्फिडन्स स्कोअर’ (Confidence Score) असेल, ज्यामुळे फायनान्शियल कंपन्यांना समजेल की ग्राहकाचा डेटा किती अचूक आणि सुरक्षित आहे. या प्रणालीमुळे आर्थिक व्यवहारांवर देखरेख करणे सोपे होईल आणि फसवणुकीला आळा घालता येईल. विशेष म्हणजे बँका, विमा योजनांनंतर म्युच्युअल फंडांना आणि भांडवली बाजारातील दलाली पेढयांना देखील ही प्रणाली जोडली जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com