CM Siddaramaiah : ‘...तर मी राजीनामा देतो’; कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी मोदींना का दिले आव्हान ?

Karnataka CM challenges Modi and BJP on guarantee schemes: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी कर्नाटकात येऊन पाहावे, त्यांच्यासाठी मी विशेष फ्लाईटची व्यवस्था करेन. कर्नाटकात हमी योजना लागू नसतील तर मी राजीनामा देईन.
Siddaramaiah
Siddaramaiah Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 16 November : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या हमी योजनांबाबत भाजपकडून दिशाभूल केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांनी कर्नाटकात येऊन पाहावे, त्यांच्यासाठी मी विशेष फ्लाईटची व्यवस्था करेन. कर्नाटकात हमी योजना लागू नसतील तर मी राजीनामा देईन. आमच्या सर्व हमी योजना सुरू असून भाजपकडून सुरू असलेला खोटा प्रचार थांबवून महाराष्ट्राची माफी मागावी, असे जाहीर आव्हान कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाजपला दिले.

पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या प्रचारासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची सभा झाली. त्या सभेत बोलताना सिद्धरामय्या यांनी भाजपला थेट आव्हान दिले आहे.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) म्हणाले, कर्नाटकात शक्ती योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत बस प्रवास दिला जातो. अन्नभाग्य योजनेतून तांदूळ वाटप केला जातो. युवानिधीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता दिला जातो. याशिवाय गृहलक्ष्मी आणि दरमहा दोनशे युनीट वीज मोफत दिले जाते. ह्या सर्व योजना कर्नाटकात सुरू आहेत.

Siddaramaiah
Ajit Pawar : मी सोशल इंजिनिअरिंग केलंय; सगळ्यांना एका चष्म्यातून बघू नका : अजितदादांचे सूचक विधान

कर्नाटकच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जाहीर केलेल्या योजना सर्व योजना आजही सुरू आहेत. आम्ही दरवर्षी 56 हजार कोटी रुपये थेट कर्नाटकातील करोडो लोकांच्या खात्यात हमी योजनेद्वारे जमा करत आहोत. भारतीय जनता पक्ष मात्र आमच्या हमी योजनांबाबत खोटा प्रचार करीत आहेत. भाजपच्या लोकांनी कर्नाटकात येऊन एकदा पाहणी करावी, म्हणजे आमच्या हमी योजनेबाबत त्यांना कळेल, असेही सिद्धरामय्या यांनी सुनावले.

काँग्रेस आणि महाविकास आघाडीनेही महाराष्ट्रात हमी योजना जाहीर केल्या आहेत. महाआघाडी महाराष्ट्रात सत्तेत येऊन आश्वासन पूर्ण करणार आहे. कारण काँग्रेसला वचन पाळण्याचा इतिहास आहे, त्यामुळे भाजपला हरवून येथील मतदारांनी आर्थिक शक्ती मिळवावी, असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले.

Siddaramaiah
Solapur Airlines : सोलापूर ते तिरुपती विमानसेवा लवकरच सुरू करणार; केंद्रीय मंत्री मोहोळ यांची घोषणा

भारतीय जनता पक्षाने उद्योजकांना कर्जमाफी दिली आहे. आम्ही कर्नाटकात शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी केली, त्या वेळी तेथील भाजप सरकारने आमच्याकडे काय नोटा छापायचे मशीन आहे का, असा सवाल करून ती टाळली होती. पण आम्ही सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com