Chicken Neck Corridor : देशातील सर्वात संवेदनशील भाग केंद्र सरकारच्या हवाली; मुख्यमंत्र्यांनी मान्य केली अनेक वर्ष जुनी मागणी

Suvendu Adhikari Centre Government : 'सिलिगुडी कॉरिडॉर' भारताच्या मुख्य भूभागाला ईशान्येकडील राज्यांशी जोडतो. आंतरराष्ट्रीय सीमांच्या अगदी जवळ असल्यामुळे लष्करीदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण आहे.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Suvendu Adhikari News : पश्चिम बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर अनेक बदल होत आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत महत्वाचा असलेल्या 'चिकन नेक' आता केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत संवेदनशील असलेल्या 'चिकन नेक' कॉरिडॉरमधील 120 एकर जमीन केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय अधिकारी यांनी घेतल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

या रिपोर्टनुसार, ही जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 'चिकन नेक' म्हणून ओळखला जाणारा हा अरुंद 'सिलिगुडी कॉरिडॉर' भारताच्या मुख्य भूभागाला ईशान्येकडील राज्यांशी जोडतो. आंतरराष्ट्रीय सीमांच्या अगदी जवळ असल्यामुळे लष्करीदृष्ट्या संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पश्चिम बंगाल सरकरने हा भूभाग केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातो आहे. सिलिगुडीच्या परिसरात स्थित असलेला हा कॉरिडॉर जमिनीचा एक अरुंद पट्टा आहे, ज्याच्या सीमा नेपाळ, भूतान आणि बांगलादेशला भिडलेल्या आहेत. तसेच चीनच्या तिबेट प्रदेशापासून देखील हा भूभाग जवळ आहे. काही ठिकाणी या कॉरिडॉरची रुंदी अवघी २० ते २२ किलोमीटर इतकी कमी आहे.

Narendra Modi, Amit Shah
Gaokao vs NEET : तब्बल 1.30 कोटी विद्यार्थ्यांची 'फुलप्रूफ' परीक्षा; चीनचे कसे असते सुरक्षाकवच? NEET पेक्षा कशी वेगळी?

ईशान्येकडील आठ राज्यांसाठी वाहतूक, व्यापार, लष्करी हालचाली आणि पुरवठा साखळीच्या दृष्टीने हा मार्ग 'जीवनवाहिनी'चे काम करतो. या कॉरिडॉरचे लष्करीदृष्ट्या महत्त्व प्रचंड असल्यामुळे भारताच्या संरक्षण नियोजनात आणि सीमा सुरक्षा धोरणात हा भाग दीर्घकाळापासून केंद्रस्थानी राहिला आहे.

Narendra Modi, Amit Shah
NEET UG 2026 Cancelled : देशातील प्रवेश परीक्षांना कशाचे ग्रहण? 9 वर्षांत 16 हून अधिक परीक्षांचा खेळखंडोबा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com