Cockroach Conclave: सीजेपीचं राजकीय पक्षात रुपांतर होणार? अभिजीत दिपकेंनी कोअर ग्रुपच्या बैठकीच्या अजेंड्याबाबत स्पष्ट केली भूमिका

Cockroach Conclave: कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता या संघटनेच्या संस्थापकांचं तसंच कोअर ग्रुपमधील सदस्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं आहे.
Cockroach Conclave_Abhijeet Dipke
Cockroach Conclave_Abhijeet Dipke
Published on
Updated on

Cockroach Conclave: कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन यशस्वी झाल्यानंतर आता या संघटनेच्या संस्थापकांचं तसंच कोअर ग्रुपमधील सदस्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसतं आहे. सुरुवातीला दुर्लक्ष केलेली माध्यमही त्यांना स्वतःहून बोलावून घेऊन त्यांच्या मुलाखती प्रसारित करत आहेत. भारतातल्या आजच्या तरुणांचा मूड काय आहे? हे जाणून घेत आहेत. यामुळं सध्या सीजेपीच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे.

विविध माध्यमातून आता या संघटनेची पुढची पावलं काय असतील? याबाबत सातत्यानं विचारणा केली जात आहे. त्यावरच विचारमंथन करण्यासाठी सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपल्या घरी म्हणजेच छत्रपती संभाजी नगरमध्ये आपल्या सर्व कोअर ग्रुपच्या सदस्यांना भेटीचं निमंत्रण दिलं असून दोन दिवसाची त्यांची कॉक्रोच कॉन्क्लेव्हच पार पडणार आहे. आज या कॉन्क्लेव्हचा पहिला दिवस झाला यावेळी बैठकीत सीजेपीचं राजकीय पक्षात रुपांतर करण्याबाबत नेमकी काय चर्चा झाली? याची सविस्तर माहिती अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

Cockroach Conclave_Abhijeet Dipke
Valmik Karad: वाल्मिक कराडला बीडच्या तुरुंगात मिळतेय VIP ट्रिटमेंट? मुख्यमंत्र्यांकडं दोन खासदारांची महत्वाची मागणी; संतोष देशमुख प्रकरणात नेमकं काय सुरुए?

कॉक्रोच कॉन्क्लेव्हचा अजेंडा काय?

कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन दिवसीय बैठकीचा आज पहिला दिवस पार पडला. या बैठकीला अभिजीत दिपके यांनी कॉक्रोच कॉन्क्लेव्ह असं संबोधलं आहे. त्यांनी म्हटलं की, आज आम्ही दोन दिवसीय कॉक्रोच कॉन्क्लेव्हची सुरुवात करत आहोत. जिथं आमचा पुढचा रोडमॅप काय आहे? पुढे देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. कारण जंतर-मंतरचं जे आंदोलन झालं त्याला देशभरातून मोठं समर्थन मिळालं होतं. इतक्या मोठ्या विजयानंतर आमच्या जबाबदाऱ्यांसोबत लोकांच्या अपेक्षाही खूप वाढलेल्या आहेत. त्यासाठी संपूर्ण देशभरात आमचं संघटन कसं वाढवण्यात येईल याबाबत आम्ही या कॉक्रोच कॉन्क्लेव्हमध्ये चर्चा करणार आहोत. दोन दिवसांच्या या बैठकीत जी काही चर्चा होईल, त्याची माहिती आम्ही उद्या पत्रकार परिषद घेऊन देणार आहोत.

झारखंडमध्ये सध्या जे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे, त्यांच्याशी आम्ही बोललो आहोत. त्यांना आम्ही समर्थनंही दिलं आहे, तसंच त्यांना सांगितलं की त्यांचं आंदोलन मजबूत करण्यासाठी जे काही करता येईल ते आम्ही सर्वकाही करु. तसंच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तिथं जाणार आहोत.

आम्ही सध्या कॉक्रोच जनता पार्टी म्हणून राजकारणात उतरण्याचा विचार नाही. कारण सध्या राजकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, मीडिया असोत किंवा निवडणूक आयोग असोत या सर्व संस्थांवरुन जनतेचा भरवसा उडाला आहे. आमच्या संघटनेला जो देशभरातून पाठिंबा मिळाला होता तो केवळ परीक्षांच्या मुद्द्यापर्यंत मर्यादित नव्हता तर जसं जसं आंदोनल वाढत होतं, या सर्व संस्थांवरील विश्वास कमी झाला आहे जनतेचा ते यातून दिसतं होतं. त्यामुळं आम्हाला वाटतं की, या संस्थांमध्ये पुन्हा जबाबदारी आणण्यासाठी तसंच कुठे ना कुठे यात निष्पक्षता आणण्यासाठी कुठेतरी दबाव गटाची, जनचळवळीची आणि जनतेच्या दबावाची गरज आहे.

Cockroach Conclave_Abhijeet Dipke
Supreme Court: आंदोलनं चिरडण्यासाठी सरकारनं आक्रमक पवित्र्यावर सुप्रीम कोर्टाची कठोर टिप्पणी; मोदी सरकार बॅकफुटवर

त्यामुळं आजच्या राजकीय पक्षांची स्थिती खूपच वाईट झालेली आहे, सकाळी लोक एखाद्याला निवडून देतात आणि त्यानंतर रात्री दुसऱ्या कोणाचं तरी सरकार बनलेलं असतं. सकाळी एका पक्षाचे आमदार-खासदार निवडून दिले तर ते संध्याकाळी दुसऱ्या पक्षात गेलेले असतात. जर हे नाही घडलं तर मतदारांची नाव डिलिट होतात, जर हे देखील झालं नाही तर आपल्या जेवढ्या राजकीय पक्ष आहेत ते फोडले जातात. ईडी-सीबीआय पाठवून, त्यामुळं अशा परिस्थितीत जनता या सर्व गोष्टींना कंटाळली आहे. त्यामुळं आमच्या जनचळवळीला यामुळेच पाठिंबा मिळाला की सर्वांनी आपल्या विचाधारांना बाजूला सोडून एकत्र यायला हवं. त्यातून ही जनचळवळ देशातील लोकांनी सुरु केली. त्यामुळं सध्या देशाला आणखी राजकीय पक्षांची गरज नाही तर सध्या भारताला जनचळवळींची आणि दबाव गटांची गरज आहे.

सरकार आता डिलिमिटेशन बिल आणण्याची तयारी करत आहे, त्यावर देखील आमच्या व्यासपीठावर आम्ही चर्चा करु, असंही यावेळी अभिजीत दिपके यांनी सांगितलं. त्याचबरोबर E20 चा मुद्दा सध्या तापलेला आहे त्यावरही आम्ही चर्चा करणार आहोत. बेरोजगारी आणि देश सध्या जो आर्थिक संकटात आहे त्यावर सध्या सरकार काहीही बोलायला तयार नाही, या सर्व मुद्द्यांवर आम्ही चर्चा करणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com