Cockroach Janata Party : "भारतात येताच अटक, मला विमानतळावरच भेटा..." कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दिपकेंनी आपल्या समर्थकांना केलं मोठं आवाहन

Abhijeet Dipke India Return : मागील काही दिवसांपासून देशातील नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेतील वारंवार होणाऱ्या अपयशांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी संविधानिक आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी दिपके भारतात येणार आहेत.
CJP Abhijeet Dipke
CJP Abhijeet DipkeSarkarnama
Published on
Updated on

Abhijeet Dipke India Return : अवघ्या काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत आलेल्या आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके हे आंदोलन करण्यासाठी भारतात येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यानुसार ते ६ जून रोजी अमेरिकेतून भारतात येणार आहेत.

मागील काही दिवसांपासून देशातील नीट सारख्या महत्त्वाच्या परीक्षेतील वारंवार होणाऱ्या अपयशांमुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी संविधानिक आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी दिपके भारतात येणार आहेत.

मात्र, भारतात आल्यानंतर मला अटक होऊ शकते, तरीही मी भारतात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच अटक होण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या समर्थकांना मला थेट विमानतळावरच भेटा, असं आवाहन केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता पोलीस खरोखरच दिपके यांना विमानतळावरून अटक करणार का की त्यांना आंदोलन करू देणार याकडे लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

CJP Abhijeet Dipke
Nashik MLC : मतदारांचे डोळे दिपले; शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना आव्हान देणारा बंडखोर उमेदवार 100 कोटींचा मालक!

अभिजीत दिपके नेमकं काय म्हणाले?

अभिजीत दिपके म्हणाले, "विमानतळावर उतरताच मला अटक होऊ शकते, याची मला कल्पना आहे. तरीही मी भारतात येणार आहे. माझ्या परतीचे परिणाम काय होतील याची मला पूर्ण खात्री आहे. परंतू पुन्हा अमेरिकेला येण्याबाबतही माझे मन पक्के आहे. तसंच अनेक लोकांनी मला पाठिंबा दर्शवला असून ते या आंदोलनात सामील होतील, असा विश्वास दीपके यांनी व्यक्त केला आहे.

CJP Abhijeet Dipke
MLC Election 2026 : एक मताला १५ लाखांचा भाव? विधानपरिषद निवडणुकीतील 'लक्ष्मीदर्शना'वर 24 तास नजर, आयकर विभाग सतर्क!

तर नीट पेपर लीक प्रकरण, CBSE या सारख्या भरती व प्रवेश परीक्षांमधील गोंधळ या पार्श्वभूमीवर दिपके यांचं आंदोलन होणार आहे. पेपर फुटीच्या प्रकरणांमुळे १ कोटीहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आलं असून हा प्रश्न कोणत्याही एका परीक्षेपुरता मर्यादित नसून सरकारला जबाबदारीची जाणीव करून देणे ही आमची दीर्घकालीन योजना असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता दिपके हे ६ जूनला आल्यानंतर त्यांचं आंदोलन यशस्वी होणार की त्यांना आंदोलनापूर्वीच ताब्यात घेतलं जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com