Cockroach Janata Party viral : सरन्यायाधीशांच्या विधानानंतर सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'चा धुमाकूळ : फक्त 72 तासांत 46 लाख फॉलोअर्स!

Chief Justice statement viral reaction : सरन्यायाधीशांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. X आणि इंस्टाग्रामवर अवघ्या 72 तासांत 46 लाख फॉलोअर्स मिळाल्याने ही मोहीम प्रचंड व्हायरल झाली आहे.
cockroach janata party viral on social media
cockroach janata party viral on social mediaSarkarnama
Published on
Updated on

सरन्यायाधीशांच्या एका विधानानंतर सोशल मीडियावर अचानक “कॉकरोच जनता पार्टी” म्हणजेच CJP या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मागील 72 तासांत X आणि Instagram वर या मोहिमेने प्रचंड वेग घेतला असून तरुणांमध्ये याची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. सुरुवातीला अनेकांना हा एखादा विनोदी मीम पेज किंवा ट्रोल कॅम्पेन वाटला होता, मात्र काही तासांतच लाखो लोक त्याच्याशी जोडले गेले.

फक्त तीन दिवसांत या पेजला तब्बल 46 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे हजारो तरुणांनी स्वतःला या “पार्टी”चे सदस्य म्हणून सोशल मीडियावर जाहीरही केले आहे. त्यामुळे “कॉकरोच जनता पार्टी” नेमकी काय आहे आणि तिच्यामागे कोण आहे, याची उत्सुकता वाढली आहे.

cockroach janata party viral on social media
Farmer Subsidy Scheme : शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! 'पर ड्रॉप मोर क्रॉप' योजनेअंतर्गत सिंचन साहित्यावर मिळतीये 70 ते 75 टक्के सबसिडी; जाणून घ्या काय आहे योजना

या संपूर्ण चर्चेची सुरुवात सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीतून झाली. बनावट पदवीप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही लोक “कॉकरोचप्रमाणे व्यवस्थेत शिरतात” अशा आशयाचे वक्तव्य केल्याची चर्चा सोशल मीडियावर झाली. नंतर न्यायालयाकडून हे विधान सर्वसामान्य बेरोजगार तरुणांसाठी नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर या मुद्द्याची मोठी चर्चा रंगली होती.

याच वातावरणात अभिजीत दीपके यांनी 16 मे रोजी X वर एक पोस्ट केली. “सगळे कॉकरोच एकत्र आले तर काय होईल?” या एका वाक्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आणि त्यातून “कॉकरोच जनता पार्टी” हा ट्रेंड सुरू झाला.

या मोहिमेची खास गोष्ट म्हणजे तिची विनोदी आणि टोमणेखोर शैली. “बेरोजगार”, “आळशी”, “सतत ऑनलाइन राहणारे” आणि “दुःख व्यक्त करण्यात प्रोफेशनल” अशा मजेशीर अटी सदस्यत्वासाठी ठेवण्यात आल्या. Gen-Z तरुणांना हा सेल्फ-रोस्टिंग अंदाज प्रचंड आवडला आणि अनेकांनी मजेमजेत या मोहिमेला पाठिंबा दिला.

कोण आहेत अभिजीत दीपके?

अभिजीत दीपके हे मूळचे छत्रपती संभाजीनगर येथील असून ते राजकीय संवाद रणनीतीकार म्हणून काम करतात. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून अमेरिकेतील Boston University मधून Public Relations मध्ये उच्च शिक्षण पूर्ण केले आहे. यापूर्वी 2020 ते 2022 दरम्यान त्यांनी आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया टीममध्येही काम केले होते.

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले अनेक मीम्स आणि प्रचार मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली शिक्षण विभागात कम्युनिकेशन सल्लागार म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती.

cockroach janata party viral on social media
Valmik Karad News: वाल्मीक कराडची प्रकृती बिघडली; जेलमध्येच तीन दिवसापासून सलाईन!

‘कॉकरोच जनता पार्टी’ ही संकल्पना सुरुवातीला विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने सुरू झाली असली तरी आता ती सोशल मीडियावरील चर्चेचा मोठा विषय ठरत आहे. बेरोजगारी, महागाई आणि तरुणांच्या समस्यांवर हलक्याफुलक्या भाषेत भाष्य करणारे व्हिडीओ आणि पोस्ट लोकांना आकर्षित करत आहेत. अनेकांनी याला फक्त मनोरंजन मानले असले तरी काही जण या माध्यमातून तरुणांच्या असंतोषाचा आवाज समोर येत असल्याचे म्हणत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com