Dharmendra Pradhan Resignation : विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्याशिवाय थांबणार नाही; अभिजित दीपके यांचा इशारा

Dharmendra Pradhan Resignation Demand Over Student Deaths: छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या अभिजीत दिपके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नीट पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले.
Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignationSarkarnama
Published on
Updated on

Education Minister resignation controversy: 'नीट' पेपरफुटी प्रकरणावरून काॅक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा एकदा लावून धरली आहे.

"केवळ अधिकाऱ्यांच्या बदल्या करून सरकार जबाबदारी झटकू शकत नाही. देशातील एक कोटी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाला आहे. त्यामुळे कोणाची तरी जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.

छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आलेल्या दिपके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना नीट पेपरफुटी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. "या प्रकरणामुळे सहा-सात विद्यार्थ्यांनी (Student) आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या पालकांवर काय बीतत असेल, याचा विचार सरकारने करायला हवा. जर धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला नाही, तर पंतप्रधानांनी स्वतः या प्रकरणाची जबाबदारी घ्यावी," असे ते म्हणाले.

या वेळी त्यांनी केंद्र सरकारवर (Central Government) अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचाही आरोप केला. आजचा तरुण सरकारला घाबरत नाही. मात्र सरकारला प्रश्न विचारणारे विद्यार्थी, पत्रकार आणि विरोधक यांना 'पाकिस्तानी' ठरवण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. लोकांनी निर्भयपणे प्रश्न विचारले नाहीत, तर व्यवस्था कधीच सुधारणार नाही, असे आवाहन त्यांनी केले.

Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
CJP Political Analysis : हिंदू-मुस्लिममध्ये अडकवले, किती जणांना नोकरी मिळाली? कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनानं काय साधलं?

बेरोजगारीच्या मुद्द्यावरही दीपके यांनी सरकारला लक्ष्य केले. देशात दरवर्षी सुमारे 50 लाख विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. त्यापैकी केवळ 20 लाखांना रोजगार मिळतो, तर उर्वरित 30 लाख युवक बेरोजगार राहतात.

आगामी काळात युवकांच्या प्रश्नांवर आम्ही व्यापक आंदोलन उभारणार आहोत. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण असेल आणि त्याला विविध क्षेत्रातील विचारवंतांचे समर्थन मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

Abhijit Deepke demands Dharmendra Pradhan resignation
CJP Funding : कॉक्रोच जनता पार्टीला पैसा कुठून मिळतोय? मुख्य प्रवक्ते सौरव दास यांचं खास उत्तर

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिपके यांच्या आंदोलनाला 'अराजकता' असे संबोधल्याच्या प्रश्नावरही त्यांनी प्रत्युत्तर दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानणारे लोक अराजकी असतात का? जय भीमची घोषणा देणे अराजकता आहे, असे मुख्यमंत्री म्हणत आहेत का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Rahul Gandhi, Abhijeet Dipke
Anna Hazare
Rahul Gandhi Protest | Dharmendra Pradhan | NEET Row
PM Modi breaks silence on NEET controversy
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com