मुलाच्या विरोधात लढण्याची राणेंची घोषणा अन् 24 तासांतच काँग्रेसकडून तिकीट

पुत्राच्या विरोधातच लढण्याची घोषणा करुन माजी मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना धक्का दिला होता.
BJP, Congress
BJP, Congress

Sarkarnama

Published on
Updated on

पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीची (Goa Assembly Election) धामधूम सुरू आहे. यातच गोव्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ करणारी घोषणा काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) यांनी केली होती. त्यांनी आपलेच पुत्र भाजप (BJP) नेते व आरोग्यमंत्री डॉ. विश्वजित राणे (Vishwajit Rane) यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली होती. यानंतर 24 तासांतच काँग्रेसने प्रतापसिंह राणेंना तिकीट दिले आहे.

राणे यांनी मुलाच्या विरोधात लढण्याची घोषणा काल (ता.21) केली होती. यानंतर काँग्रेसने तातडीने पावले उचलली आहेत. राणे यांना पोरीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याची अधिकृत घोषणाही काँग्रेसने केली आहे. प्रतापसिंह राणे हे दहा वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते गोव्याचे सहा वेळा मुख्यमंत्री होते. आता त्यांनी पुत्राच्या विरोधातच निवडणूक लढण्याची घोषणा करुन राज्यात राजकीय भूकंप घडवला आहे. विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातले राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता राणे-पिता पुत्रांच्या लढतीने त्यात भर पडली आहे. या लढतीकडे आतापासूनच सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

BJP, Congress
वडिलांच्या विरोधात लढणार का? यावर राणेंचे पुत्र म्हणाले, हा आमच्या घरचा प्रश्न!

गोव्याच्या राजकारणात आतापासूनच राणे पिता-पुत्राच्या या लढाईची चर्चा होऊ लागली आहे. पुत्राविरोधात निवडणूक लढण्याची घोषणा करून प्रतापसिंह राणे यांनी सगळ्यांनाच धक्का दिला आहे. ते म्हणाले होते की, काँग्रेसचे पदाधिकारी आणि हितचिंतकांनी मला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची विनंती केली आहे. पोरीम मतदारसंघातून मी काँग्रेसकडून निवडणूक लढावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळे मी पोरीम मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.

BJP, Congress
ओमिक्रॉनची रुग्णसंख्या देशात सर्वाधिक होताच दिल्ली सरकारचे कडक निर्बंध

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. काँग्रेसनेही जोर लावला असला तरी प्रत्यक्षात मागील निवडणुकीएवढी ताकद आता राहिलेली दिसत नाही. मागील निवडणुकीत काँग्रेसला 40 पैकी 17 जागा मिळाल्या होत्या. सर्वाधिक आमदार काँग्रेसचे होते. पण त्रिशंकू स्थितीमध्ये काँग्रेसला चकवा देत भाजपने सत्ता स्थापन केली. हीच काँग्रेसची धूळधाण उडण्याची सुरूवात होती. आता राज्यात काँग्रेसचे केवळ 2 आमदार उरले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com