BK Hariprasad RSS BJP Bengaluru : RSS-BJPला बंगळुरूतून हाकलून द्या; हरिप्रसादांच्या वक्तव्याने कर्नाटकात वाद

BK Hariprasad RSS-BJP remarks trigger a fresh political row in Karnataka : KPCC अध्यक्षांची काँग्रेस कार्यकर्त्यांना हाक; ‘वंदे मातरम्’वरून RSSवरही निशाणा, भाजप नेते चलवादी नारायणस्वामींचा पलटवार
BK Hariprasad RSS BJP Bengaluru
BK Hariprasad RSS BJP BengaluruSarkarnama
Published on: 
Updated on: 

RSS BJP controversy : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि भाजपविरोधातील काँग्रेसची आक्रमक भूमिका कर्नाटकात पुन्हा चर्चेत आली आहे. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समितीचे (KPCC) अध्यक्ष बी. के. हरिप्रसाद यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना RSS आणि भाजपला बंगळुरातून हाकलून देण्याचे आवाहन केले.

त्यांच्या या वक्तव्यावर भाजपकडून आक्षेप घेण्यात आला असून, या विधानामुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण तापले आहे. हरिप्रसाद यांच्या आक्रमक विधानानंतर काँग्रेस-भाजप संघर्षाला आता RSSच्या मुद्द्याचीही जोड मिळाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील आगामी राजकीय चर्चेत या विधानावरून दोन्ही पक्षांकडून आणखी प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.

बंगळुरू येथे काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांना संबोधित करताना हरिप्रसाद यांनी भाजपच्या आमदारांवरही टीका केली. भाजपचे आमदार ‘बनावट’ असल्याचा आरोप करताना त्यांना ‘वंदे मातरम्’ हे गीतही म्हणता येत नसल्याचे ते म्हणाले. त्याउलट काँग्रेसचे कार्यकर्ते हे गीत चांगल्या प्रकारे गाऊ शकतात, असा दावा त्यांनी केला.

हरिप्रसाद यांनी ‘वंदे मातरम्’ गीताचा उल्लेख करत RSSवरही टीका केली. ‘वंदे मातरम् हे आमचे आहे. तुम्ही खाकी चड्डी घाला, हातात काठी घ्या आणि संध्याकाळी फिरायला जा,’ अशा शब्दांत त्यांनी RSSला लक्ष्य केले.

BK Hariprasad RSS BJP Bengaluru
Ahilyanagar DCC Bank Politics : यशवंतराव गडाखांच्या हाकेनंतर 'विखे-थोरात' एकत्र; नगर जिल्हा बँकेसाठी शरद पवार पडद्यामागून सूत्रं हलवतायत?

काँग्रेसच्या संघटनात्मक भूमिकेवर बोलताना हरिप्रसाद यांनी पक्षाची तुलना वाहत्या पाण्याशी केली. काँग्रेस हा साचलेल्या पाण्यासारखा पक्ष नसून वाहत्या पाण्यासारखा आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसने कोणालाही वाऱ्यावर सोडलेले नाही आणि भविष्यातही सोडणार नाही, असा दावा त्यांनी केला. पक्षासाठी सातत्याने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पद आणि जबाबदारी मिळते, असे सांगताना त्यांनी आपण स्वतः त्याचे उदाहरण असल्याचेही नमूद केले.

BK Hariprasad RSS BJP Bengaluru
RSS criticism : ‘संघ हा दैत्यासारखा’! मंत्री प्रियांक खर्गे यांच्या विधानानं राजकीय वाद

मुख्य निवडणूक आयुक्तांवरही टीका

हरिप्रसाद यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही जोरदार टीका केली. त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्यासाठी ‘अज्ञानी’ हा शब्द वापरला आणि ते पदावरून जाईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले. मतदारयादीच्या मुद्द्यावरही त्यांनी चिंता व्यक्त केली. संबंधित बाबींकडे दुर्लक्ष झाल्यास पात्र मतदारांची नावे मतदारयादीतून वगळली जाऊ शकतात, असा आरोप त्यांनी केला. संविधानाचा गैरवापर होत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदारयादीबाबत सतर्क राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कोणालाही बंगळुरू सोडण्यास भाग पाडता येणार नाही

दरम्यान, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी यांनी हरिप्रसाद यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. कोणालाही बंगळुरू सोडून जाण्यास भाग पाडता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. RSSच्या गणवेशाचा आणि हातातील काठीचा उल्लेख करताना नारायणस्वामी यांनी त्याचा अर्थ कोणाला मारहाण करणे असा होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हरिप्रसाद यांच्या विधानावरून काँग्रेस आणि भाजपमधील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com