

West Bengal Political News : पश्चिम बंगालच्या राजकारणात पुन्हा एका मोठा ट्विस्ट आला आहे. राज्यात सध्या तृणमूल काँग्रेसचे दोन गट आणि नंदीग्राम, रेजीनगर या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचीच चर्चा आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काही तासांपूर्वीच टीएमसीचे नाव व चिन्ह गोठवत ममता बॅनर्जी यांना धक्का दिला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीसाठी त्यांना फुटबॉलपटू हे चिन्ह आणि ममता तृणमूल काँग्रेस हे नाव दिले आहे.
ज्या पोटनिवडणुकीसाठी ममतांच्या पक्षाला नवे नाव आणि चिन्ह मिळाले, त्या निवडणुकीआधीच त्यांना मोठा झटका बसला आहे. नंदीग्राम मतदारसंघातील ममतांच्या पक्षाच्या उमेदवार संचिता प्रधान डे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. शिक्षिका म्हणून नोकरी करत असलेल्या संचिता यांच्या माघारीमुळे बंगालच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
संचिता प्रधान यांनी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची भेट घेतल्यानंतर काही वेळातच उमेदवारी अर्ज मागे घेतला. सुमारे तासभर चाललेल्या त्यांच्या बैठकीत नेमकं काय घडलं, काय चर्चा झाली, याबाबत आता उत्सुकता वाढली आहे. या मतदारसंघात ममता बॅनर्जी आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये थेट लढतीची शक्यता होती. आता भाजपसाठी ही निवडणूक अधिकच सोपी झाली आहे.
सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघ सोडल्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. हा मतदारसंघ त्यांचाच बालेकिल्ला आहे. भाजपच्या तिकीटावर ते दोनदा निवडून आले आहे. या निवडणुकीत ममता बॅनर्जी स्वत: रिंगणात उतरून टक्कर देतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी संचिता प्रधान यांच्यावर विश्वास दाखविला होता. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
संचिता प्रधान या मागील अनेक वर्षांपासून तृणमूलच्या कार्यकर्त्या म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी नंदीग्रामध्ये पंचायत समितीची निवडणुकही लढविली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्या पेशाने शिक्षिका असून शिक्षक भरती घोटाळ्यात त्यांची नोकरी गेली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर त्यांना पुन्हा नोकरी मिळाली होती. त्या बोयाल प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.