Rahul Gandhi Tweet: 'आ रहा हूं...सवाल जारी रहेंगे'; राहुल गांधींना दिलासा मिळताच काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर

Congress In Active Mode: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेसच्या ट्विटची चर्चा; 'यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत हैं'
Rahul Gandhi Tweet: 'आ रहा हूं...सवाल जारी रहेंगे'; राहुल गांधींना दिलासा मिळताच काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर
Published on
Updated on

Delhi News : मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर काँग्रेसच्या गोटात आनंदाची भरती आली आहे. देशभर सगळीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते जल्लोष करत असतानाच काँग्रेसने सूचक ट्वीट करत भाजपला पुन्हा एकदा टार्गेट करत 'यह नफरत के खिलाफ मोहब्बत की जीत हैं', असे म्हटले आहे.

तर काँग्रेसने दुसऱ्या ट्विटमध्ये 'आ रहा हूं...सवाल जारी रहेंगे', असे म्हणत राहुल गांधींचा संसदेतील फोटो शेअर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दिलासा मिळताच काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर आल्याचे बोलले जात आहे.

Rahul Gandhi Tweet: 'आ रहा हूं...सवाल जारी रहेंगे'; राहुल गांधींना दिलासा मिळताच काँग्रेस 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर
Supreme Court On Rahul Gandhi: राहुल गांधींना कोर्टाकडून मोठा दिलासा; खासदारकी पुन्हा मिळणार..

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे राहुल गांधींना मोठा दिलासा मिळाला असून आता त्यांना पुन्हा खासदारकी मिळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. मोदी आडनाव प्रकरणी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती. गुजरातमध्ये राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर हे प्रकरण सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले होते.

राहुल गांधींना दोन वर्षाची शिक्षा सुनावल्यानंतर लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली होती. पण आता राहुल गांधी यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यांना पुन्हा खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पार्श्वभूमीवरच काँग्रेसकडून आनंद साजरा करण्यात येत असून काँग्रेस यापुढे आणखी जोमाने मोदी सरकारला प्रश्न विचारणार असल्याचे सूचक ट्विट करण्यात आले आहे. 'आ रहा हूं...सवाल जारी रहेंगे', असे काँग्रेसने ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com