Congress leader hospitalised : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची अचानक प्रकृती खालावली! तातडीने रुग्णालयात दाखल; समर्थकांसह पक्षातील सहकाऱ्यांची चिंता वाढली

Congress leader V Hanumantha Rao Health Update : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तेलंगणातील प्रमुख राजकारणी व्ही. हनुमंत राव यांची प्रकृती खालावल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Congress leader V Hanumantha Rao
Congress leader V Hanumantha Raosarkarnama
Published on
Updated on

V Hanumantha Rao News : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. हनुमंत राव यांची अचानक प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने शनिवारी (ता.२७) रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या बातमीनंतर काँग्रेससह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून काँग्रेच्या नेत्यांनी हैदराबाद येथील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ नेफ्रोलॅाजी अँड युरोलॉजीकडे (AINU) धाव घेतली आहे. किडनीशी संबंधित जुन्या आजाराचा त्रास त्यांना सोमवारी रात्री उशिरा जाणवू लागला होता. ज्यानंतर आज त्यांची अचानक प्रकृती खालावल्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर तात्काळ अत्याधुनिक उपचार सुरू केले जात आहेत.

वैद्यकीय सूत्रांनुसार, व्ही हनुमंत राव यांना अशा गंभीर आरोग्य समस्येचा सामना पहिल्यांदाच करावा लागत नसून यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारच्या किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एका तज्ज्ञ नेफ्रोलॉजिस्टच्या देखरेखीखाली झालेल्या सघन उपचारानंतर ते पूर्णपणे बरे झाले होते.

आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर, त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले. जे त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून त्यांची तपासणी करत आहे.

Congress leader V Hanumantha Rao
Congress Leader on Petrol price hike : सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार! पेट्रोल 150 अन् डिझेल थेट 170 रुपये लिटर पार..? काँग्रेस नेत्याच्या दाव्यानं खळबळ!
Congress leader V Hanumantha Rao
Congress Leader Arrest : काँग्रेस नेत्यावर अटकेची टांगती तलवार! कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान राव यांच्यावर उपचार करणारे वरिष्ठ सल्लागार नेफ्रोलॉजिस्ट डॉ. राजेश नायर यांनी रुग्णालयाबाहेर त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, रुग्णालयात आणल्यावेळी त्यांच्या किडनीचे कार्य व्यवस्थित होत नव्हते. मात्र प्राथमिक उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सध्या किडनीचे कार्य सुधारण्यासाठी आवश्यक औषधे दिली जात असून पुढील 48 तास त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे. तर व्ही. हनुमंत राव रुग्णालयात दाखल केल्याची बातमी वाऱ्यागत पसरली असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Congress leader V Hanumantha Rao
Congress Leader Murdered: काँग्रेस नेत्याची घरात घुसून हत्या; लग्नाच्या काही दिवस आधीच दुर्दैवी अंत! CCTV मध्ये थरार कैद

तर या बातमीमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आणि पक्षातील सहकाऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. तर विविध राजकीय पक्षांचे अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रुग्णालयात येत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com