Pune LokSabha Constituency : कसबा पॅटर्न लोकसभा इलेक्शनलाही तारणार; रवींद्र धंगेकरांचा निर्धार पक्का!

Pune Political News : 'आपला माणूस' रवींद्र धंगेकर यांना 'कसबा पॅटर्न'च्या पुनरावृत्तीची आशा..
Pune LokSabha Constituency : Pune Political News
Pune LokSabha Constituency : Pune Political News Sarkarnama
Published on
Updated on

LokSabha Election 2024 : पुणे महापालिकेत तब्बल पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आलेल्या आमदार रवींद्र धंगेकर यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अगदी रात्री-अपरात्री एखाद्या नागरिकाने मदतीसाठी फोन केला तर धंगेकर यांच्याकडून त्याला प्रतिसाद मिळतो, अशी त्यांची ख्याती आहे. इतकी वर्षे नगरसेवक म्हणून काम करूनही चारचाकी गाडीचा वापर न करता ते दुचाकीनेच मतदारसंघात फिरतात. त्यामुळे धंगेकर यांची नागरिकांशी असलेली नाळ अधिकच घट्ट झाली. अगदी महापालिकेत असलेल्या हेल्पलाइन नंबरवर फोन करून नागरिकांनी सांगितलेल्या अडचणीही धंगेकर यांच्यापर्यंत पोहोचायच्या आणि त्या सोडवण्यासाठी ते धाव घेत होते. (Latest Marathi News)

Pune LokSabha Constituency : Pune Political News
Pune Lok Sabha Seat : पुणे लोकसभेसाठी काँग्रेसचा 'पहिला गिअर' : 20 इच्छुक अन् महत्त्वाची बैठक...

जन्माच्या दाखल्यापासून मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळेच रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयात मिळू लागले. प्रभागातील नागरिकांच्या या छोट्या-छोट्या गरजा ओळखून त्यांनी काम सुरू ठेवले. कोणाला रुग्णालयात मदत हवी असेल की अन्य कोणतीही अडचण... यासाठी रवींद्र धंगेकर यांचा फोन रात्री-अपरात्री सुरूच असतो. कसब्यातील जनतेसाठी अर्ध्या रात्री धावणारा 'आपला माणूस' म्हणून धंगेकर यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सतत कार्यकर्त्यांच्या गराड्यात राहणारे पुणे शहरातील व्यक्तिमत्त्व म्हणून धंगेकर यांची ओळख आहे.

विधिमंडळात आमदार म्हणून शपथ घेताना त्यांनी आपल्या नावापुढे रवींद्र लक्ष्मीबाई ऊर्फ सुलोचना हेमराज धंगेकर नाव लावल्याने सबंध महाराष्ट्रातून त्याची चर्चा झाली. त्यानंतर सातत्याने पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर आमदार धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून प्रबळ दावेदार म्हणूनदेखील त्यांच्या नावाची चर्चा जोर धरत आहे. धंगेकर यांनी राजकारणाची सुरुवात 1989 पासून शिवसेनेतून केली. ते 1991 मध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख बनले.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
NCP Crisis : यापुढे शरद पवार यांच्या वयाचा मुद्दा काढल्यास त्याच भाषेत उत्तर देऊ; अजितदादांना थेट इशारा

नाव (Name)

रवींद्र हेमराज धंगेकर

जन्मतारीख (Birth date)

12 मार्च 1968

शिक्षण (Education)

दहावी

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background)

रवींद्र धंगेकर यांचा जन्म सर्वसाधारण कुटुंबात झाला. त्यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. त्यांच्या मातुःश्री या गृहिणी आहेत. रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी गृहिणी आहेत. हिंदमाता प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत असताना त्यांना पत्नी प्रतिभा धंगेकर यांची मोलाची साथ लाभते. त्यांचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business)

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency)

पुणे

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation)

काँग्रेस

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey)

रवींद्र धंगेकर हे 1997 मध्ये शिवसेनेकडून पहिल्यांदा पुणे महापालिका निवडणुकीत विजयी झाले. 2002 मध्ये ते पुन्हा नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मनसेच्या उमेदवारीवर ते 2007 आणि 2012 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी मनसेकडून 2009 ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गिरीश बापट यांना तगडे आव्हान दिले होते. गिरीश बापट नवख्या धंगेकरांपुढे अवघ्या 7 हजार मतांच्या फरकाने विजयी झाले. या निवडणुकीनंतर रवींद्र धंगेकर यांची ओळख खासदार गिरीश बापट यांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून निर्माण झाली. 2014 मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली, मात्र तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत त्यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2019 मध्ये काँग्रेसने रवींद्र धंगेकराना उमेदवारी दिली नाही.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
Atal Setu News : अटलसेतूच्या उद्घाटनासाठी भाजप कार्यकर्त्यांच्या गर्दीचं लक्ष्य

गेल्या तीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी प्रत्येक निवडणुकीत सक्रिय सहभागी घेतला आहे. आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभूत केले. येथे 28 वर्षांनंतर भाजपचा किल्ला ढासळल्याने या निकालाला मोठे महत्त्व प्राप्त झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांचा 11 हजार 40 मतांनी पराभव केला. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात त्यांनी नगरसेवक म्हणून मोलाचा वाटा उचलला आहे. पुणे मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्विकास धोरणे, सार्वजनिक बस वाहतूकव्यवस्था व अनेक विकासात्मक प्रकल्पांसह एलबीटी समस्या सोडविण्याचे काम केले आहे. त्याशिवाय काँग्रेस पक्षाचे विविध कार्यक्रम, प्रकल्प आणि धोरणांचा प्रचार, प्रसार केला आहे.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency)

रुग्णवाहिकासेवा, आरोग्य शिबिरे आणि गरजू तसेच अनाथ मुला-मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन, गरजू शेतकऱ्यांना शेळीवाटप, टंचाईग्रस्त व दुष्काळग्रस्त भागांत धान्य, चाऱ्याचे वितरण, पूर परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष पूरग्रस्त भागात जाऊन मदत पुरवली. नाट्यमहोत्सवाचे आयोजन, अनाथ मुलांना शालेय गणवेशाचे, तसेच स्टेशनरी साहित्याचे वाटप, शाळांना संगणक, प्रिंटरचे वितरण, मुलांसाठी आनंद उत्सवाचे आयोजनही त्यांनी केले आहे. वारकऱ्यांसाठी चहावाटपाचा कार्यक्रम, दरवर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णा भाऊ साठे जयंती आणि छत्रपती शिवाजीमहाराज जयंती उत्सव कार्यक्रमांचे आयोजन ते करतात.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
Pune Loksabha Election : 'कसबा' जिंकलेल्या काँग्रेससमोर आता ठाकरेंचं चॅलेंज; 'पुणे' लोकसभेवर 'डोळा'

दरवर्षी दिवाळीच्या काळात पूजा साहित्याचे वाटप, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रांचे वितरण, गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन, सरकारी योजनांचा नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन ते करतात. ई-सेवा केंद्राच्या माध्यमातून अनेकांना त्यांचे आधारकार्ड, पॅनकार्ड व उत्पन्नाचा दाखला व काही जणांना महत्त्वाची कागदपत्रे वितरित करण्यात आली. एमपीएससी आणि यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत ऋतुजा अभ्यासिका त्यांनी सुरू केली आहे. कामगारदिनानिमित्त कामगारांसाठी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रेन हार्वेस्टिंग कार्यक्रमाच्या माध्यमातून पाणी वाचवण्याबाबत त्यांनी जनजागृती केली. कसबा विधानसभा मतदारसंघांत कॉस्ट ट्रेनर वॉटर हार्वेस्टिंग प्रोग्राम सुरू केला. या उपक्रमाचा 27 जणांना फायदा झाला.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
Ravindra Dhangekar : निवडणुकीनंतर धंगेकर-रासने पहिल्यांदाच एकत्र; शुभेच्छा देत म्हणाले...

2019 मधील निवडणूक लढविली होती का ? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election)

रवींद्र धंगेकर यांनी 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election)

निवडणूक लढवली नव्हती.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency)

रुग्णालयात मदत असू द्या किंवा इतर कोणतीही अडचण... रवींद्र धंगेकर 24 तास उपलब्ध असतात. मतदारसंघात प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा आमदार अशी त्यांची ओळख आहे. त्याचा त्यांना मोठा फायदा होत आहे. दिवसभर ते सतत काम करीत असल्याचा फायदा त्यांना होतो. कसबा विधानसभा मतदारसंघातील विकासकामांवर त्यांचे बारकाईने लक्ष असते. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या ते नियमित बैठका घेतात. मतदारसंघातील विकासकामांचा ते नियमित आढावा घेतात. ते नेहमी कार्यकर्त्यांच्या गराड्यात असतात. कसबा मतदारसंघातील जुन्या-जाणत्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांना व युवा मंडळींना व महिलांना ते त्यांच्या नावानिशी ओळखतात. त्यांचा जनसंपर्क मोठा असल्याने नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांना मोठा फायदा झाला.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
MLA Dhangekar Visit Sasoon Hospital : आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर भडकले; नेमकं काय घडलं ?

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles)

सोशल मीडियावर ते सतत सक्रिय असतात. त्यांनी केलेली कामे, भेटीगाठी सातत्याने सोशल मीडियाच्या माध्यामातून पोहोचवल्या जातात. फेसबुक, इन्टाग्राम, तसेच व्हॉटसॲपचा वापर प्रभावीपणे करतात. महापालिकेत नगरसेवक व आमदार म्हणून केलेले काम सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम ते करतात. पक्षाची ध्येयधोरणे, भाषणे, मेळावे याची माहिती ते सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवरून कार्यकर्त्यांना देत असतात. पुणे शहरातील पक्षीय घडामोडी, कार्यक्रमांमधील सहभाग यांची माहिती, छायाचित्रे दररोज त्यांच्या फेसबुक पेजवर पोस्ट केले जातात. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी, कार्यकर्ता यांच्याशी त्यांची वैयक्तिक ओळख आहे.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate)

कोणताही विचारविनिमय न करता मोदी सरकार तुघलकी निर्णय घेऊन देशात अनागोंदी माजवत आहे. नोटाबंदी, कृषी कायदे आणि आता हे वाहतुकीचे कायदे... देश ठप्प करण्याची एकही संधी मोदी सरकार सोडत नाही. जनतेला वेठीस धरण्याचे प्रकार बंद करून मोदी सरकारने राज्यकारभारावर लक्ष केंद्रित करावे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. भयमुक्त जीवन हा देशातील प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कोथरूड भागातील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
Ravindra Dhangekar : भाजपमध्ये गुंडांना आश्रय; रवींद्र धंगेकरांची बोचरी टीका

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate)

काँग्रेसचा एकनिष्ठ कार्यकर्ता अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. प्रत्येकाच्या मदतीला रात्री-अपरात्री धावून जाणे, प्रत्येकाच्या सुख-दु:खात सहभागी होऊन तन-मन-धनाने मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. पुण्यात काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. विशेषतः तरुण, अल्पसंख्याक, कामगारवर्ग, महिला आणि दलित समुदायात ते लोकप्रिय आहेत. प्रामाणिकपणा, साधेपणा या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. कार्यकर्ता म्हणून जनतेचे प्रश्न तडीस नेण्याचे काम त्यांनी नेहमीच केले आहे. कसब्यातील जनतेने त्यांचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिल्यानंतर ते जबाबदारी ओळखून काम करीत आहेत. पुणे शहराच्या विविध प्रश्नांवर आमदार धंगेकर यांनी आक्रमक पवित्रा घेत ते सोडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यातील काही प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत.

तत्कालीन राज्य सरकारने रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याची अंमलबजावणी झाली नव्हती, हे महामंडळ लवकर सुरू करणाऱ्यांची मागणी आमदार धंगेकर यांनी विधानसभेत लावून धरली. त्याला लवकरच मंजुरी मिळण्याचाही शक्यता आहे. त्यासोबतच गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यावर पोलिस प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, म्हणून पोलिस आयुक्त व थेट मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याशिवाय ड्रग्जमाफिया ललित पाटीलप्रकरणी कारवाई करण्याची मागणी लावून धरली. ससूनचे माजी अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांना बडतर्फ करण्याची मागणी केली.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
MLA Ravindra Dhangekar : आमदार रवींद्र धंगेकर यांच्या कार्यालयाजवळ मोठी चोरी

नुकत्याच झालेल्या अधिवेशनात त्यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. त्यासोबतच स्वतः ससून रुग्णालयात जाऊन ठाकूर यांच्या नावाची पाटी काढत त्यांनी पोलिस आयुक्ताचे लक्ष वेधले. या प्रकरणात अनेक आंदोलनदेखील त्यांनी केले. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर पोलिस प्रशासनाने या प्रकरणातील जबाबदार मंडळींना अटक केली. त्यासोबतच आजही त्या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणेने करावा, अशी मागणी केली आहे.

या विषयासह पुण्यातील जुन्या वाड्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीदेखील व महामंडळ स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासोबतच शहरात वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता वाढीव पाणी मिळावे, त्यासाठी भविष्यात अतिरिक्त धरणाची आवश्यकता भासणार आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी शासनाने उपाययोजना कराव्यात, यासाठी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आवाज उठवला. रखडलेले शहराचे प्रश्न मार्गी लावत असताना त्यांनी नाट्यरसिकासाठी स्पर्धेचे आयोजन केलं होते. नुकतेच त्यांनी काँग्रेस आणि हिंदमाता प्रतिष्ठान आयोजित आठदिवसीय नाट्य महोत्सवाचे आयोजनदेखील केले होते. यामागेदेखील शहराची संस्कृती ओळख टिकून राहावी, ही त्यांची भावना होती.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate)

पुणे लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे येत्या काळात तुल्यबळ उमेदवार दिल्यास पुण्यातील लढत चुरशीची होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडी एकसंध ठेवण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न आवश्यक आहेत. काँग्रेसमधले सर्व गट, निष्ठावंताना एकत्र आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार. निवडणुकीत भाजपच्या प्रचार यंत्रणेच्या तुलनेत तुटपुंजी यंत्रणा आहे. प्रचारयंत्रणेत काँग्रेस कार्यकर्त्यांना उतरवावे लागणार आहे. काँग्रेसचा झोपडपट्टी भागातील मतदार मतदान केंद्रापर्यंत आणावा लागणार आहे. महाविकास आघाडी एकत्र ठेवावी लागणार आहे. कसबा मतदारसंघातील जुने वाडे व छोटे रस्ते व रस्त्यावरील खड्डे बुजविले गेले नाहीत, यामुळे नाराजी आहे. पुणे शहरातील नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतोय, या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्याचा येत्या काळात फटका बसण्याची शक्यता आहे.

Pune LokSabha Constituency : Pune Political News
Pune Loksabha : धंगेकर इच्छुक पुण्यात; जबाबदारी सातारची, विश्वजित कदम पुन्हा पुण्याची खिंड लढवणार ?

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If didn’t get chance to contest LokSabha election what will be the consequences)

काँग्रेसकडे पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांच्याशिवाय दुसरा तुल्यबळ उमेदवार सध्या तरी दिसत नाही. चार वेळा नगरसेवक व भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात त्यांनी विजय मिळवला. पुणे शहरातील काँग्रेसचे ते एकमेव आमदार आहेत. कसबा मतदारसंघातील विकासकामांच्या जोरावर ते मतदारांना सामोरे जाऊ शकतात. त्यांनी केलेल्या आजपर्यंतच्या कामांची मतदारसंघातील नागरिकांना जाणीव आहे. त्याशिवाय संपूर्ण पुणे शहराची त्यांना माहिती आहे. विशेषतः ससून रुग्णालयातील ड्रग्ज रॅकेटला वाचा फोडत विधिमंडळात राज्य सरकारला या प्रश्नावरून घेरत ससूनचे डीन व डॉक्टरांवर कारवाई करण्यास त्यांनी भाग पाडले. त्यामुळे त्यांना उमेदवारी न दिल्यास या जागेवर काँग्रेसची अडचण होऊ शकते. उमेदवारी नाही मिळाली तरी रवींद्र धंगेकर पक्षाविरोधात बंडखोरी करणार नाहीत.

(Edited By - Chetan Zadpe)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com