Epstein Files : 'एपस्टिन फाईल्स'मध्ये नरेंद्र मोदींचा उल्लेख, 'नाचले, गायले अन्...', पृथ्वीराज चव्हाणांनी 'तो' दावा ठरणार खरा?

Epstein Files Narendra Modi : लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या कुप्रसिद्धी व्यक्तीसोबत भारताच्या पंतप्रधानांची जवळीक त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नउपस्थित करते, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
Epstein-Narendra Modi
Epstein-Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Congress News : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी डिसेंबर महिन्यात 'एपस्टिन फाईल्स'मध्ये मोठ्या राजकीय नेत्यांची नावे असणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी राजीनामा देतील आणि मराठी पंतप्रधान होईल, असा दावा केला होता. आता काँग्रेसने प्रवक्ते पवन खेडा यांनी ट्विट करत सांगितले की, एपस्टिन फाईल्समध्ये नरेंद्र मोदींचे नाव आले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, संपूर्ण देशासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की "अमेरिकेतील दोषी, मानवी तस्कर, बाल लैंगिक शोषण आणि सीरियल बलात्कारी जेफ्री एपस्टाईन यांने लिहिले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा "सल्ला घेतला आणि इस्रायलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी गाणी गायली आणि नाचली. ते काही आठवड्यांपूर्वी भेटले. ते काम केले! आणि त्याचा फायदा झाला. "

लैंगिक शोषणाचे आरोप असणाऱ्या कुप्रसिद्धी व्यक्तीसोबत भारताच्या पंतप्रधानांची जवळीक त्यांच्या निर्णय क्षमतेवर प्रश्नउपस्थित करते, अशी टीका खेडा यांनी केली आहे.

एपस्टाईन आणि नरेंद्र मोदी यांच्यातील हे संबंध अक्षम्य आहेत आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचा आणि आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेचा प्रश्न आहे जो पंतप्रधानांकडून तात्काळ जबाबदारीची मागणी करतो, असे म्हणत पंतप्रधन⁠ ⁠ते जेफ्री एपस्टाईनचा सल्ला का घेत होते?⁠ ⁠ते इस्रायलमध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या कोणत्या फायद्यासाठी नाचत आणि गात होते? मेलमध्ये लिहिले आहे - "ते काम केले!" ते काम कोणते आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Epstein-Narendra Modi
Girish Mahajan Politics: धक्कादायक; सत्तेच्या सौद्यात अर्थखात्याचा बळी? राष्ट्रवादीकडून भाजपला, अजित पवारांचं खातं ‘गिफ्ट’!

परराष्ट्र मंत्रालयाने आरोप फेटाळले

भारतीय विदेश मंत्रालयचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी 'एपस्टीन फ़ाइल्स' च्या इमेल मसेजमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि जेफ़री एपस्टीन यांची भेट झाल्याचा दावा फेटाळला आहे. त्यांनी म्हटले की, जुलै 2017 मध्ये प्रधानमंत्री की इस्त्रायलच्या दौऱ्यावर केले होते. मात्र ईमेलमधील बाकीच्या गोष्टी केवळ या अपराध्याची केवळ बकवास आहे.

Epstein-Narendra Modi
NCP Merger Issue : ‘मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो...’; फडणवीसांच्या दाव्यानंतर शशिकांत शिंदे झाले भावूक

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com