NCP Merger Issue : ‘मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो...’; फडणवीसांच्या दाव्यानंतर शशिकांत शिंदे झाले भावूक

Shashikant Shinde Emotional : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांच्या निधनानंतर विलिनीकरणाच्या चर्चेबाबत स्पष्ट केले. त्यांनी काळजी न करण्याचं आश्वासन दिलं होतं.
Shashikant Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis
Shashikant Shinde-Ajit Pawar-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 01 February : अजितदादांच्या जाण्यानंतर जी काही चर्चा होत आहे, तीच मुळात दुर्दैवाची आहे. मी फार प्रामाणिकपणे बोलतो. अजितदादांशी आमचं भावनिक नातं होतं. मी अजितदादांची शपथ घेऊन सांगतो...विलिनीकरणाची चर्चा झाली होती. अजितदादांनी कोणाशी चर्चा केली होती, याबाबत आम्हाला माहिती नाही. पण चर्चेला आल्यानंतर अजितदादा सांगायचे, मी बोललो आहे, तुम्ही काळजी करू नका. मी निर्णय घेणार आहे. त्यामुळे आपण विलिनीकरणाचा निर्णय घ्यायचा आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची तारीख ठरली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं. त्याबाबतची आम्हाला काही माहिती नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे. त्यावर आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या वतीने भूमिका स्पष्ट केली आहे.

आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) म्हणाले, अजितदादा ज्या वेळी आमच्याशी चर्चा करायले आले होते. त्या वेळी त्यांनी मी बोललो आहे, असे सांगायचे. तसेच तुमच्या मित्रपक्षांशी चर्चा झाली आहे का, असे विचारताच त्यांनी ‘मी वरिष्ठांशी बोललो आहे’, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे ‘तुम्ही (अजितदादा) ज्यांच्याशी बोलला आहात, त्यांची नावं सांगा,’ असं विचारण्याचं धाडस आम्ही करू शकत नाही ना.

आता ती चर्चा कोण नाकारतंय, याच्याशी आम्हाला काही देणंघेणं नाही. आम्हाला त्याचं भावनिक राजकारण करायचं नाही, आम्हाला काही राजकीय स्वार्थ साधायचा नाही. आम्ही आमची इच्छा मीडियाने विचारल्यानंतर बारा फेब्रुवारीचा मुद्दा मांडला होता. दोन्ही पक्षाचे विलिनीकरण करायचं, नाही करायचं, हा आता त्यांचा निर्णय आहे, असे सांगून शिंदेंनी राष्ट्रवादीच्या कोर्टात चेंडू ढकलला आहे.

Shashikant Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis
Ajit Pawar Death : ‘अजितदादांनी मुलाच्या लग्नाला सुनेत्रावहिनींसह जोडीने येण्याचा शब्द दिला होता; पण नियतीने घात केला’

शशिकांत शिंदे म्हणाले, आम्ही फक्त अजितदादांची अंतिम इच्छा काय होती, हे व्यक्त केले. त्यात आम्हाला काय फायदा आहे, आम्हाला कोणता राजकीय स्वार्थ साधायचा आहे. शरद पवार यांची भूमिका स्पष्ट होती. तरीसुद्धा आम्हाला वाटलं म्हणून भूमिका मांडली. विलिनीकरण करायचं किंवा नाही करायचं, हे त्यांच्या पक्षानं ठरवावं.

Shashikant Shinde-Ajit Pawar-Devendra Fadnavis
NCP President Controversy : राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नको पाटील हवा म्हणणाऱ्या राज ठाकरेंना भाजप नेत्यांनी सुनावले, 'नवनिर्माण...'

आता एका बाजूला फडणवीस असं बोलतात आणि दुसरीकडे म्हणतात की त्यांच्या पक्षाच नेतृत्व कोणी करावं, याचा निर्णय त्यांच्या पक्षातील नेत्यांनी करावा. दोन्ही बाजूंनी बोलणं योग्य नाही. पण, असो आम्ही हा विषय आता इथपर्यंतच मर्यादित ठेवतोय. आम्ही आमची भावना व्यक्त केली आहे, या विषयावर आता चर्चा करायची गरज नाही, असं मला वाटतं. याचा राजकीय फायदा किंवा विश्लेषण कोण करत असेल तर ते दुर्दैवी आहे, असेही शिंदेंनी नमूद केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com