Sexual harassment case : लैंगिक छळ प्रकरणातील ‘त्या’ सहा महिलांमध्ये मीही! काँग्रेस आमदाराचा गौप्यस्फोट, भाजप नेत्यावर गंभीर आरोप

Vinesh Phogat allegations, Brij Bhushan sexual harassment case : दिल्लीतील जंतरमंतर येथे २०२३ मध्ये विनेश फोगाट यांच्यासह साक्षी मलिक यांच्यासह इतर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते.
Wrestler and Congress MLA Vinesh Phogat speaks out about sexual harassment case involving former MP Brij Bhushan Singh.
Wrestler and Congress MLA Vinesh Phogat speaks out about sexual harassment case involving former MP Brij Bhushan Singh.Sarkarnama
Published on
Updated on

Indian politics sports controversy : महिला कुस्तीपटूंवर लैंगिक अत्याचार केल्याच्या प्रकरणात तीन वर्षांपूर्वी दिल्लीत आंदोलन करण्यात आले होते. कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष व भाजपचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात सहा महिला कुस्तीपटूंनी तक्रार दिली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यानंतर तीन वर्षांनी या प्रकरणात सर्वात मोठा खुलासा समोर आला आहे.

काँग्रेसच्या हरियाणातील आमदार व कुस्तीपटू विनेश फोगाट यांनी पहिल्यांदाच गौप्यस्फोट केला आहे.बृजभूषण सिंह यांच्याविरोधात तक्रार दिलेल्या सहा महिलांमध्ये आपणही असल्याचे फोगाट यांनी पहिल्यांदाच सार्वजनिकपणे जाहीर केले आहे. त्यांच्या या खुलाश्यामुळे खळबळ उडाली आहे.

विनेश फोगाट यांनी रविवारी एक भावुक व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत आपण आपली ओळख उघड करू इच्छित नव्हते. हे प्रकरण कोर्टात प्रलंबित असून त्याची सुनावणी सुरू आहे.

Wrestler and Congress MLA Vinesh Phogat speaks out about sexual harassment case involving former MP Brij Bhushan Singh.
Assembly Election Result : टपाली मतांची तीन वर्षांनंतर पुन्हा मोजणी; काँग्रेस आमदाराला धक्का, भाजपच्या पराभूत उमेदवाराने मारली बाजी...

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पीडितेची ओळख गोपनीय ठेवली जाते. पण सध्याच्या स्थितीमुळे मला हे पाऊल उचलावे लागले. अशा स्थितीत खेळाडूसाठी पूर्ण क्षमतेने योगदान देणे खूप कठीण असते, असे फोगाट यांनी म्हटले आहे. त्यांनी बृजभूषण यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, आशियाई स्पर्धेआधीच्या ट्रायल्स जाणीवपूर्वक बृजभूषण यांचा गड असलेल्या उत्तर प्रदेशातील गोंडा येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

एका खासगी काँलेजमध्ये या ट्रायल्स होणार असून त्यामध्ये निष्पक्ष निवडीची शक्यता खूप कमी असल्याचा आरोपही फोगाट यांनी केला आहे. बृजभूषण हे आता कोणत्याही पदावर नसले तरी त्यांचा कुस्ती महासंघाच्या कामकाजावर प्रभाव अजूनही आहे. मॅचमध्ये रेफरी कोण असणार, कुणाला किती गुण या सगळ्या बाबींवर त्यांच्या जवळच्या लोकांचा प्रभाव असेल, असा दावाही फोगाट यांनी केला आहे.

Wrestler and Congress MLA Vinesh Phogat speaks out about sexual harassment case involving former MP Brij Bhushan Singh.
WB election update : IPS अधिकाऱ्याच्या व्हायरल व्हिडिओने गाजलेली निवडणूक; आयोगानं उचललं महत्वपूर्ण पाऊल

काय घडलं होतं २०२३ मध्ये?

दिल्लीतील जंतरमंतर येथे २०२३ मध्ये फोगाट यांच्यासह साक्षी मलिक यांच्यासह इतर महिला कुस्तीपटूंनी आंदोलन केले होते. ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बजरंग पूनियाही या आंदोलनात सहभागी झाले होते. बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले होते. हे आंदोलन थांबविण्यासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईवरून बरेच वादळ उठले होते. दरम्यान, बृजभूषण यांनी आपल्यावर झालेले आरोप यापूर्वीच फेटाळून लावले आहेत. महिला कुस्तीपटूंच्या तक्रारीनंतर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सध्या सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com