दिल्ली : काँग्रेसचे पंजाबमधील लोकसभा खासदार जसबिरसिंग गिल यांनी आज एक अत्यंत वेगळा मुद्द्यावर सरकारने कायदा करावा अशी मागणी केली. भारतात लग्नांमध्ये अगणित खर्च होतो, या खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी सरकराने कायदा करावा अशी मागणी गिल यांनी केली. गिल यांच्या या मागणीवर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भन्नाट उत्तर देत खासदारांची मागणीवर प्रतिक्रिया दिली.
मागणी करताना गिल म्हणाले, भारतात लग्नांमध्ये अगणित पैसे खर्च होतात. हजारो लोक आणि विविध पद्धतीचे जेवण असते. मात्र यावर नियंत्रण यायला हवे. त्यामुळे सरकारने ५० वऱ्हाडी आणि जास्तीत जास्त ११ पद्धतीचे जेवण असावे, असा कायदा बनवावा. यावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी गिल यांना थांबत म्हणाले, संसद सदस्यांनी याची सुरुवात आपल्यापासून करावी. देश त्याचे अनुकरण करेल.
त्यावर आपण सुरुवात केली आहे, पण आपल्याला लोकांना जर शिस्त लावायची असेल तर आपल्याला असा कायदा आणावा लागेल. त्यावर पुन्हा ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप करत ही शिस्त कायद्याने नाही तर स्वतःच्या इच्छाशक्तीने लागते. सर्व देशातील खासदारांनी जर या खर्चावर नियंत्रण आणले, तर देशात शिस्त लागयला वेळ लागणार नाही, असे गिल यांना सांगितले. गिल यांनी त्यानंतर देखील असा कायदा आणवा ही मागणी लावून धरली. पाकिस्तानमध्ये देखील असा कायदा असल्याचे अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.