MLC election news : विधानपरिषद निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आमदारासह माजी आमदाराची पक्षातून हकालपट्टी; आमदारकीही जाणार?

Anant Singh expelled, Bihar Legislative Council election : माजी आमदार नीलम देवी आणि युवा जेडीयूचे सचिव अमित प्रकाश यांनीही जेडीयू्च्या उमेदवाराविरोधात काम केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
MLA Anant Singh expelled
MLA Anant Singh expelledSarkarnama
Published on: 
Updated on: 

Latest Bihar news : बिहारमधील शिक्षक व पदवीधर विधानपरिषद मतदारसंघाच्या १२ जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. त्यानंतर काही तासांतच संयुक्त जनता दलाने आमदार अनंत सिंह यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात प्रचार करणे त्यांना भोवले आहे. त्यांच्यासोबतच माजी आमदार नीलम देवी आणि युवा जेडीयूच्या प्रदेश सचिवांचीही हकालपट्टी करण्यात आली आहे.

जेडीयूने शनिवारी अनंत सिंह यांच्यावरील कारवाईचा आदेश काढला आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे म्हटले आहे. अनंत सिंह यांनी जेडीयूचे उमेदवार नीरज कुमार यांच्याविरोधात प्रचार केला होता. त्यांनी आमदार प्रशांत भूषण यांच्या जन सुराज पक्षाचे उमेदवार अनुज कुमार यांना पाठिंबा दिला होता.

पक्षाकडून अनंत सिंह यांच्या आमदारकी रद्द करण्याची मागणीही विधानसभा अध्यक्षांकडे केली जाऊ शकते. तसे संकेत पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे अनंत सिंह यांना ही बंडखोरी महागात पडू शकते. मात्र, असे असले तरी अनंत सिंह यांना पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी घराबाहेर फटाके वाजवून आनंद व्यक्त केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

MLA Anant Singh expelled
Maharashtra viral Audio Clip : जरांगे पाटील यांच्या ऑडिओ क्लिपचे नाशिक कनेक्शन? विरोधात बैठक घेणारे नेते कोण?

माजी आमदार नीलम देवी आणि युवा जेडीयूचे सचिव अमित प्रकाश यांनीही जेडीयू्च्या उमेदवाराविरोधात काम केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान,पक्षातून निलंबित करण्यात आल्यानंतर अनंत सिंह यांनी नव्या पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. मला आमदारकीची चिंता नाही. मी कधी तिकीट मागितले नाही, पक्षानेच उमेदवारी दिली, असेही अनंत सिंह म्हणाले आहेत.

MLA Anant Singh expelled
कॉक्रोच जनता पार्टीसमोर राहुल गांधीही फेल, भाजप तर कोसो दूर

नितीश कुमार यांचा पक्ष होता, आता त्यांचे राजकारण संपले असून पक्षही संपला आहे. जेडीयूचे आता कसलेही भविष्य नाही. निवडणुकीत हे स्पष्ट होईल. पक्षाला दहा जागाही मिळणार नाहीत. पूर्वी पक्ष नितीश कुमार यांचा होता, ते स्वत: निर्णय घेत होते. पण आता तसे राहिले नाही, असा दावा सिंह यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com