

Congress Reaction: कॉक्रोच जनता पार्टीच्या देशव्यापी आंदोलनानं अखेर मोदी सरकारला झुकवलं असून शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यावर आता सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसनं सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळं केवळ प्रधानांचा राजीनामा घेऊन चालणार नाही, असं काँग्रेसनं यामध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसनं ट्विट करुन म्हटलं की, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा देशातील तरुणांचा आणि 'जनरेशन झेड'चा (Gen Z) विजय आहे. हा विजय देशभरातील त्या करोडो तरुणांचा आहे ज्यांनी अधिक चांगल्या शिक्षण व्यवस्थेच्या मागणीसाठी आपला आवाज उठवला. नरेंद्र मोदींचा अहंकार धुळीस मिळाला आहे आणि त्यांच्या खोटेपणाचा पराभव झाला आहे. तरुणांनी धर्मेंद्र प्रधान या अकार्यक्षम आणि भ्रष्ट शिक्षण मंत्र्याला राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. नीट (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पहिल्या दिवसापासूनच, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाने तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यापासून संसदेपर्यंत लढा दिला आहे. शिक्षण व्यवस्था सुधारली जाईपर्यंत हा लढा सुरूच राहील. आपल्या तरुणांवर लाठीचार्ज आणि पेलेट-गनचे हल्ले करण्याचे आदेश दिल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागितलीच पाहिजे.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं की, भारतातील विद्यार्थ्यांचा आवाज अखेर त्या अहंकारी सत्तेच्या दारापर्यंत पोहोचला आहे. शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी देशभरातील रस्त्यांवर आवाज उठवणाऱ्या आपल्या लाखो तरुणांचा हा विजय आहे. हा सत्याचा विजय आणि मोदींच्या हट्टीपणाचा पराभव आहे. ज्या कुटुंबांनी आपली मुले गमावली, कारण हे सरकार भ्रष्ट आहे. त्या सर्व कुटुंबांचा हा विजय आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी संसदेपासून रस्त्यांपर्यंत आवाज उठवणाऱ्या एकवटलेल्या विरोधी पक्षांचा हा विजय आहे. आता मोदींची पाळी आहे की त्यांनी आपल्या तरुण पिढीची माफी मागावी आणि ज्यांनी त्यांच्यावर लाठ्या, दंडुके व पेलेट गन्सचा वापर केला, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.