

Congress News : डिलिमीटेशनसाठी भाजपने संख्याबळ जमवल्याची चर्चा आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले एम के स्टॅलिन यांच्या पक्षाच्या भूमिकेवर हे बील पास होणार की नाही, हे ठरणार आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी बिलाला पाठींबा देण्याची तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, स्टॅलिन यांची नेमकी भूमिका काय हे स्पष्ट होऊ शकले नाही.
तमिळनाडूतील सत्तांतरानंतर काँग्रेसने डीएमकेची साथ सोडत टीव्हेकेसोबत जाणे पसंत केले होते. त्यामुळे स्टॅलिन यांच्या डीएमकेने इंडिया आघाडीची साथ सोडली होती. त्यामुळे आता डिलिमीटेशनच्या मुद्यावर विरोधकांची एकजूट राहावी, यासाठी काँग्रेसने प्रयत्न सुरू केले आहेत.
एम के स्टॅलिन यांची नाराजी दूर करण्यासाठी बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जबाबदारी असल्याचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. बॅनर्जी या विरोधकांची एकजुटी कायम राहावी आणि या बिलाला विरोध करण्यात यावा, यासाठी स्टॅलिन यांच्याशी सातत्याने संवाद साधत असल्याची माहिती आहे.
डिलिमीटेशनवर आपली भूमिका स्पष्ट करताना स्टॅलिन यांनी सांगिले की, जर कोणत्याही कारणास्तव संसदीय मतदारसंघांची संख्या वाढवली गेली, तरी तमिळनाडूचा सध्याचा ७.१८% वाटा कमी होता कामा नये, तसेच १९७१ च्या लोकसंख्येच्या आधारे निश्चित केलेले आणि यापूर्वी गोठवून ठेवलेले संसदीय प्रतिनिधित्वाचे प्रमाण, पुढील २५ वर्षांपर्यंत जैसे थेच राहिले पाहिजे!
डीएमके या दोन मुद्द्यांवर सदैव ठाम आहे. आमच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही आणि तडजोडीलाही कोणताही वाव नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या तर्कवितर्कांना किंवा पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांच्या कुजबुजीला आमच्या भूमिकेवर कोणताही परिणाम करता येणार नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.