.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Delhi News : महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुकीची धामधूम संपत नाही,तोच आता दिल्लीत विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नसलेला तरीही आता आप आणि काँग्रेस, भाजपसह यांच्यासह स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच आम आदमी पार्टीनं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत (Congress) युती करणार नसल्याचे जाहीर करत स्वबळाचा नारा दिला आहे.
अशातच आता काँग्रेसनं 'आप'वर कुरघोडी करत दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आपली 21 उमेदवारांची पहिली यादीही जाहीर केली आहे.त्यात काँग्रेसनं दिल्लीचे माजी मुख्यमंत्री व आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यासमोर तगडा उमेदवार मैदानात उतरवला आहे.
काँग्रेसने पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने पहिलं मोठं पाऊल टाकत गुरुवारी (ता.12 ) 21 उमेदवारांची यादीही जाहीर केली.या यादीत दिल्ली प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव,अनिल भारद्वाज,रागिनी नायक, हारून युसूफ,प्रवीण जैन,जय किशन,अनिल कुमार यांच्याही नावांचा समावेश आहे. तसेच नवी दिल्लीतून अरविंद केजरीवालांच्या विरोधात दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा मुलगा संदीप दीक्षित यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या झालेल्या बैठकीनंतर दिल्ली विधानसभेसाठीची पहिली यादी जाहीर करताना 21 उमेदवारांची घोषणा केली आहे. हरियाणानंतर दिल्ली विधानसभेतही आपनं स्वतंत्रपणे लढण्याचा नारा दिल्यामुळे या निवडणुकीत इंडिया आघाडी फुटली आहे.
दिल्लीत गेली दोन टर्म अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाची सत्ता आहे. आता सत्तेच्या हॅटट्रिकच्या तयारी अरविंद केजरीवाल आहेत. या निडवणुकीला समोरे जाण्यासाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षात आघाडीची चर्चा सुरू होती. परंतु आपचे संयोजक नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणुकीला स्वबळावर समोरे जाण्याची घोषणा केली. याचबरोबर काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी(ता.10)सोशल मीडियावरील एक्सवर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी आम आदमी पक्ष (AAP) दिल्लीतील निवडणूक स्वबळावर लढणार आहे. काँग्रेससोबत कुठल्याही आघाडीची शक्यता नाही असं स्पष्ट केलं होतं. यानंतर दोनच दिवसांत काँग्रेसनेही दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आक्रमक डाव टाकत केजरीवालांच्या पराभवासाठी आपला हुकमी पत्ता बाहेर काढला आहे.
आम आदमी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली असून सर्वच पक्षांना मागे टाकले आहे. पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून सोमवारी 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्याआधी पक्षाने 11 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. दुसऱ्या यादीत पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे.
आपच्या दुसऱ्या यादीत पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचेही नाव आहे. पण यावेळी त्यांचा मतदारसंघ बदलण्यात आला आहे. ते पटपडगंज या मतदारसंगातून तीनदा निवडून आले आहेत. मात्र, त्यांचा मतदारसंघ आता बदलण्यात आला आहे. त्यांना जंगपुरा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.