D Y Chandrachud News : सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वकिलांना चांगलंच सुनावलं; म्हणाले, 'घरात महिलांशी असंच..'

Supreme Court News : माईक घेताना महिलेच्या अंगावरून हात, वकिलाच्या कृत्यावर..
CJI D Y Chandrachud News
CJI D Y Chandrachud NewsSarkarnama

D Y Chandrachud News : मागील काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड अनेक गोष्टींमुळे चर्चेत केंद्रस्थानी आले आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण कारकीर्दीत अनेक महत्त्वपूर्ण खटल्यांवर न्यायनिवाडा केला आहे. सुनावणीवेळी न्यायालयात शिस्त बाळगली जावी, यासाठी नेहमी आग्रही असतात. यामुळे सुनावणी दरम्यान बेशिस्तपणे वागणाऱ्या वकिलांना ते अनेकदा झापतात.

CJI D Y Chandrachud News
Sameer Wankhede अडकवणारी Pooja Dadlani कोण ? । Shah Rukh Khan । Sarkarnama video

शुक्रवारी न्यायालयात सुनावलयात सुनावणी सुरू असताना. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी एका वकिलांना चांगलंच सुनावलं. न्यायालयात सुनावणीदरम्यान वकीलाच्या वर्तवणुकीवर नाराज झाल्यानंतर चंद्रचूड यांनी त्यांची मागणी फेटाळून लावली. तसेच बेशिस्त वर्तन करणाऱ्या वकीलाला परतून जाण्यास खडसावून सांगितले, आणि खटला दाखल करण्यासाठी आता थेट उद्या या, असे सांगितले.

CJI D Y Chandrachud News
Shivsena and Sambhaji Brigade: ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडची मुंबईत जाहिर सभा!

बार अँड बेंच’ने दिलेल्या माहितीनुसार, आज शुक्रवार दि. १९ मे रोजी खटला दाखल करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात आले होते. त्या वकीलाच्या बेशिस्त वागणूकीवरून चंद्रचूड यांनी त्यांना खडसावलं. चंद्रचूड म्हणाले, “तुम्ही हे काय करता आहात? तुमच्या समोर एक महिला उभ्या आहेत. किमान काहीतरी आदर राखा. तुम्ही घरात आणि घराबाहेरही असंच वागता का? समोर उभा असलेल्या एका महिलेच्या अंगावरून तुम्ही माईक घेत आहात. आता इथून परत जा आणि थेट उद्याच या.. किमान थोडा तरी आदर दाखवत जा. ”

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com