Shivsena and Sambhaji Brigade: ठाकरे गट अन् संभाजी ब्रिगेडची मुंबईत जाहिर सभा!

Maharashtra Politics : आता संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट एकत्र सभा घेणार असल्याने अनेकांचे लक्ष त्यांच्या सभेकडे लागले आहे.
Shivsena and Sambhaji Brigade
Shivsena and Sambhaji BrigadeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेना (ठाकरे गट) आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील समन्वय समितीची आज मुंबईतील 'मातोश्री' येथे महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली.

यामध्ये प्रामुख्याने मुंबईसह राज्यात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड हे संयुक्त सभा घेण्यावर एकमत झालं आहे. याबरोबरच जाती आणि धार्मिक वाद मिटविण्यासाठी संभाजी ब्रिगेड प्रबोधन करणार असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना बरोबर घेत शिवसेनेत बंड केलं. त्यानंतर शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून धडपड केली जात असताना संभाजी ब्रिगेडने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट मुंबईत एकत्र सभा घेणार असल्याने अनेकांचे लक्ष त्यांच्यासभेकडे लागले आहे.

Shivsena and Sambhaji Brigade
RBI Big Announcement: मोदी सरकारची दुसरी नोदबंदी; एक ऑक्टोबरपासून दोन हजाराची नोट होणार कागदाचा तुकडा

एकेकाळी संभाजी ब्रिगेड शिवसेनेच्या प्रचंड विरोधात होती. संभाजी ब्रिगेडमुळे शिवसेना भवनाबाहेर शिवसैनिकांना पहारा देण्याची वेळही एकेकाळी आली होती. एवढंच नाही तर अनेकदा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना याआधी आमने सामने आले होते.

मात्र, असं असलं तरी आता संभाजी ब्रिगेडने ठाकरे गटाला पाठिंबा दर्शवलेला आहे. त्याबरोबरच संभाजी ब्रिगेड आणि ठाकरे गट आता राज्यात संयुक्त सभा घेणार आहे, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com