Rushi Sunak : ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रिपदी माजी पंतप्रधानांची निवड; सुनक यांच्या नेतृत्वाखाली करणार काम

Suella Braverman : गृहमंत्री सुएला ब्रेवरमन यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली
Rushi Sunak, David Camron
Rushi Sunak, David CamronSarkarnama
Published on
Updated on

Britain Political News : ब्रिटनमध्ये एका दिवसात दोन धक्का देणारे निर्णय घेण्यात आले आहेत. आधी गृहमंत्री सुएला ब्रेवरमन यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात आली. नंतर माजी पंतप्रधान डेविड कॅमेरुन यांची परराष्ट्र मंत्रिपदी निवड करुन सर्वांना धक्का दिला आहे. (Latest Political News)

पंतप्रधान ऋषि सुनक यांच्या सरकारने कॅमेरुन यांना नवे परराष्ट्र मंत्री म्हणून नेमले आहे. कॅमेरुन हे आता जेम्स क्लेवरली यांची जागा घेतील. जेम्स क्लेवरली यांनी आता सुएला ब्रेवरमन यांची जागा घेतली असून त्यांची गृहमंत्रिपदी निवड झाली आहे. डेव्हिड कॅमेरुन हे २०१० ते २०१६ या कालावधीत ब्रिटनचे पंतप्रधान होते.

Rushi Sunak, David Camron
Ajit Pawar In Katewadi : '...अन् तुमच्या आजोबांकडून मी गाय घेऊनच गेलो'; अजितदादांचा भन्नाट किस्सा

डेव्हिड कॅमेरुन यांचा ब्रिटिश राजकारणातील पुनर्प्रवेश आश्चर्यकारक मानला जात आहे. गेल्या सात वर्षांपासून ते आपल्या व्यवसायात व्यस्त होते. कॅमेरुन हे २०२० मध्ये आपल्या कंपनीच्या लॉबिंगसाठी वरिष्ठ मंत्र्यांशी सातत्याने संपर्कात होते. त्यांच्या या कृतीवर मोठ्याप्रमाणात टीका करण्यात आली होती. आर्थिक संकटात असलेल्या आपल्या कंपनीला वाचवण्यासाठी एखादा नेता किती खालच्या पातळीवर जाऊ शकतो, असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. (Maharashtra Political News)

Rushi Sunak, David Camron
Congress Vs BJP : मध्य प्रदेशातील भाजप, काँग्रेस चिंतेत; अंतर्गत सर्व्हेमुळे ताण वाढला

...म्हणून सुएला यांची हकालपट्टी

दरम्यान, पंतप्रधान ऋषि सुनक यांनी सोमवारी भारतीय वंशाच्या गृहमंत्री सुएला बेवरमन यांची हकालपट्टी केली. बेवरमन यांनी मेट्रोपॉलिटन पोलिसांवर निशाणा साधत पंतप्रधानांची परवानगी न घेता वादग्रस्त लेख प्रकाशित केला होता. त्यामुळे पंतप्रधान सुनक यांनी हा मोठा निर्णय घेतला. हा वादग्रस्त लेख प्रसिद्ध झाल्यापासून बेवरमन यांच्यावर कारवाई होईल, असे बोलले जात होते.

सुनक मजबूत पंतप्रधान

डेव्हिड कॅमेरुन यांनी पंतप्रधान ऋषि सुनक यांचे कौतुक केले. ते म्हणाले, 'काही निर्णयांबाबत माझे विचार वेगळे असू शकतात. परंतु, हे स्पष्ट आहे की ऋषि सुनक एक मजबूत आणि सक्षम पंतप्रधान आहेत. मी अत्यंत आनंदाने हे पद स्वीकारले आहे. ब्रिटन सध्या अनेक आंतरराष्ट्रीय आव्हानांचा सामना करत आहे. यात युक्रेनमध्ये सुरु असलेले युद्ध आणि इतर संकटांचाही समावेश आहे. या जागतिक आव्हानांदरम्यान आपल्या देशासाठी आपल्या सहकाऱ्यांबरोबर उभे राहण्याची ही सुवर्ण संधी आहे.'

(Edited by Sunil Dhumal)

Rushi Sunak, David Camron
Madha Politics : बबनराव शिंदेंनी 'सीना माढा'चं पाणी पळवण्याचं महापाप केलं; संजय पाटील घाटणेकरांचा आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com