Delhi Assembly Election : दिल्लीत भाजपला झटका; मंदिर आघाडीला खिंडार, ‘आप’ची मोठी खेळी

Delhi BJP Temple Prakoshth AAP Sanatan Seva Samiti : आपने सनातन सेवा समिती स्थापन करण्याची घोषणा बुधवारी केली आहे.
BJP Vs AAP
BJP Vs AAPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत भाजपला झटका बसला आहे. आम आदमी पक्षाने मोठी खेळी करत भाजपच्या मंदिर आघाडीला खिंडार पाडले आहे. आघाडील अनेक साधू, धर्मगुरूंनी बुधवारी आपमध्ये प्रवेश केला. तसेच पक्षाने सनातन सेवा समिती स्थापन करण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी सर्व सदस्यांचे पक्षात स्वागत केले. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच आपकडून भाजपला धार्मिक आघाडीला धक्का देण्यात आला आहे. जवळपास 100 जणांनी आज आपमध्ये प्रवेश केला. यावेळी केजरीवाल सनातन सेवा समिती स्थापन करण्याची घोषणा करत हिंदूत्वाचे कार्ड बाहेर काढले आहे.

BJP Vs AAP
Torres Scam : धक्कादायक : टोरेस घोटाळ्यातील आरोपींचे युक्रेन, रशिया, उझबेकिस्तान कनेक्शन समोर; गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक

संपूर्ण दिल्लीतील पुजारी आपला पाठिंबा आणि आशीर्वाद देत असल्याचे केजरीवाल यांनी यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वीच आपने राज्यातील पुजाऱ्यांना दरमहा 18 हजार रुपये वेतन देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, आज विजय शर्मा, जितेंद्र शर्मा, आचार्य बृजेश शर्मा, मनीष गुप्ता, दुष्यंत शर्मा, उदयकांत झा, वीरेंद्र, सोहनदास, श्रवण दास आदींनी आपमध्ये प्रवेश केला. त्यांना ते सनातन सेवा समितीचे काम पाहतील.

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले, आम्ही सनातन धर्मासाठी मोठे काम करणार आहोत. पुजारी आणि संत 24 तास काम करतात. देव आणि लोकांमधील सेतूचे काम करतात. आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. भाजपने त्यांच्या मंदिर आघाडीसाठी काही केले नाही. निवडणुकीनंतर पुजारी ग्रंथी योजना लागू केली जाईल, असे केजरीवाल म्हणाले.

BJP Vs AAP
Baba Siddique Murder Case : ...तर बाबा सिद्दीकी यांचा जीव वाचला असता! चार्जशीटमध्ये महत्वाचे खुलासे

दरम्यान, दिल्लीमध्ये आप, भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे. प्रामुख्याने आप आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर आहे. काँग्रेसनेही मातब्बर नेत्यांना मैदानात उतरवल्याने आपची चिंता वाढली आहे. काँगेसचे उमेदवार आपच्या उमेदवारांची मते कमी करू शकतात. त्याचा फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com