Delhi University : 'दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थ्यांना धमकी, जंतर मंतरवर...';राहुल गांधी संतापले

Delhi University Threat Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी दिल्ली विद्यापीठाने दिलेल्या इशाऱ्याला थेट विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचे म्हणत त्यावर आक्षेप घेतला आहे.
Rahul Gandhi
Rahul Gandhi Sarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : जंतर-मंतर येथे कोणत्याही बेकायदेशीर जमावात किंवा आंदोलनात सहभागी होऊ नका.अशा आंदोलनांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार निर्बंध असल्याचे नमूद केले आहे. सहभागी झाल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते, असे ट्विट दिल्ली विद्यापीठाने केले आहे.

'विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो आणि त्यांच्या शिक्षण व भविष्यातील करिअरवर परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या माहितीपासून सावध राहा.', असे आवाहन त्यांनी केले आहे.

राहुल गांधी यांनी दिल्ली विद्यापीठाने दिलेल्या इशाऱ्याला थेट विद्यार्थ्यांना धमकी दिल्याचे म्हणत त्यावर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, "लोकशाही हक्कांचा वापर करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावण्याची हिंमत कशी होते?" विद्यार्थ्यांना आंदोलनापासून परावृत्त करणे म्हणजे त्यांच्या लोकशाही अधिकारांवर दबाव टाकणे असल्याचा त्यांचा आरोप आहे. तसेच वेळ आल्यावर यासाठी तुम्हालाच जबाबदार धरले जाईल, असे म्हणत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

Rahul Gandhi
Dharmendra Pradhan : राहुल गांधींनी 'ते' फोटो ट्विट करताच शिक्षणमंत्र्यांनी मौन सोडलं; थेट मुद्द्याला हात घातला, म्हणाले, "चर्चेस तयार पण काँग्रेस निर्लज्जपणे..."

'तो' पर्यंत चर्चा नाही...

जोपर्यंत धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत नाही तोपर्यंत संसदेचे कामकाज चालू देणार नसल्याचा इशारा काँग्रेसने सरकारला दिला आहे.राहुल गांधी म्हणाले की, धमेंद्र प्रधान यांना पदावरून हटवा, विद्यार्थ्यांची माफी मागा, विद्यार्थ्यांच्या विरोधात हिंसा करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करा, या विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत.

एकतर्फी मन की बात...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यरात्री व्हिडिओ करत चर्चा करू असे म्हटले आहे. त्यावर पंतप्रधानांनी एकतर्फी मन की बात करू नये, संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्यांनी संसदेत निवेदन करावे, असे म्हटले आहे. तसेच धमेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेत विद्यार्थ्यांची माफी मागणी, अशी मागणी केली आहे.

Rahul Gandhi
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com