Delimitation Bill: संसदेत पुन्हा सादर होणार डिलिमिटेशन विधेयक! भाजपच्या दोन तृतीयांश बहुमताचं काय? काँग्रेस मतदान करणार?

Delimitation Bill : आगामी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या संसदीय दलाची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी संसदेत उठवल्या जाणाऱ्या अनेक मुद्द्यांचया रणनितीवर चर्चा केली.
Congress Legislative Party Meeting
Congress Legislative Party Meeting
Published on
Updated on

Delimitation Bill : येत्या २० जुलैपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. यावेळी राम मंदिर दानचोरी, पेट्रोलमध्ये इथेनॉल ब्लेंडिंग, पेपर लीक आणि इतर मुद्द्यांवर सरकारला जाब विचारणार आहे. तर दुसरीकडं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सरकारच्यावतीनं याच अधिवेशनात पुन्हा एकदा डिलिमिटेशन विधेयक सादर केलं जाणार असल्याचं निश्चित असल्याचं सांगितलं आहे. तसंच या विधेयकाला सुचवलेल्या बदलांप्रमाणं कृती झाल्यास पाठिंबा देणार किंवा नाही हे देखील स्पष्ट केलं आहे.

Congress Legislative Party Meeting
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली! "दोन दिवसांहून अधिक जिवंत राहणं..."; दिल्ली हायकोर्टानं जनहित याचिकेची दखल घेत पाठवली नोटीस

लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधीपक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाचे इतर वरिष्ठ खासदारांनी गुरुवारी काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत सहभाग नोंदवला. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीबाबत चर्चा करताना जयराम रमेश यांनी सांगितलं की, गेल्या वेळेला सरकार डिलिमिटेशन विधेयक मंजुर करण्यात अपयशी ठरलं होतं. यावर संसदेत उशीरापर्यंत चर्चा करणं भाग पडलं होतं.

Congress Legislative Party Meeting
Jayant Patil: जयंत पाटील पुन्हा टार्गेटवर! परीक्षा सांगली-ईश्वरपुरातून होणार पण निकाल मुंबईतूनचं लागणार

डिलिमिटेशन विधेयकाची अद्याप दिली नाही माहिती - काँग्रेस

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की, "या मुद्द्यावर आमची भूमिका स्पष्ट आहे की, जेव्हा हे विधेयक मांडलं जाईल आमचा त्याला विरोध असेल. सुत्रांच्या माहितीनुसार, आम्हाला माहिती कळाली आहे की डिलिमिटेशन विधेयक संसदेत मांडलं जाणार आहे. पण अद्याप विरोधीपक्षांना याची माहिती देण्यात आलेली नाही. आम्हाला आशा आहे की, सर्वपक्षीय बैठकीत आम्हाला याची माहिती दिली जाईल. पण ही केवळ एक औपचारिकताच आहे, कारण या बैठकीत ३५-४० नेतेच बोलतात. काही मंत्री केवळ ऐकतात. पण सर्वात वरच्या पदावर बसलेले तो दोन लोक तेच करतात जे त्यांना करायचं असतं"

पक्षांमधील फूट हा संविधानाचा अपमान

जयराम रमेश यांनी तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी पक्षांतर केल्याचा देखील उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, हे खरंय की काही पक्ष आता फुटले आहेत. पण हा संविधानाचा अपमान आहे. तरी देखील भाजप दोन तृतीयांश बहुमत आणू शकत नाही. आमचं हायकमांड राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे सातत्यानं या खासदारांच्या संपर्कात आहेत.

इथेनॉलचा मुद्दाही उपस्थित करणार

काँग्रेस नेत्यानं पुढे सांगितलं की, विरोधीपक्ष इथेनॉल ब्लेंडिंग पेट्रोलचा मुद्दा देखील संसदेत उपस्थित करणार आहे. भाजपचे एक वरिष्ठ नेते आणि त्यांच्या मुलाचा यात सहभाग आहे. या मुद्द्यावर आम्ही चर्चेची मागणी करणार आहोत. जयराम रमेश यांनी नीट आणि दुसऱ्या परीक्षांमधील गोंधळामध्ये केंद्रीय शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या सोनम वांगचुक यांचा देखील उल्लेख केला. त्याचबरोबर फॉरेन कॉन्ट्रिब्युशन रेग्युलेशन अॅक्टमध्ये केलेल्या सुधारणेचा देखील काँग्रेस विऱोध करणार असल्याचं जयराम रमेश यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com