

Sonam Wangchuk: दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सध्या पर्यावरणवादी कार्यकर्ते आणि वैज्ञानिक सोनम वांगचुक हे उपोषण करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीच्यावतीनं आयोजित आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १८वा दिवस आहे, त्यांचं तब्बल ९ किलो वजन घटल्यानं त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. पण अद्याप मोदी सरकारनं त्यांच्या उपोषणाला कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळं यासंदर्भात आता दिल्ली हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून कोर्टानं आता यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.
कोर्टानं म्हटलं की, दिल्ली सरकारचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आणि स्टँडिंग काऊंसिल यांच्या मार्फत एक नोटीस केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. सुनावणीवेळी कोर्टानं म्हटलं की, केंद्र सरकारच्यावतीनं कोर्टात कोणीही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. हायकोर्टानं या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी १६ जुलै २०२६ रोजी निश्चित केली आहे. याचिकाकर्ते अधिवक्ता राकेश कुमार सैनी यांनी ही जनहित याचिका दाखल केली असून यात केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांना पक्षकार करण्यात आलं आहे.
या याचिकेत त्यांनी म्हटलं की, "सोनम वांगचुक यांची प्रकृती सातत्यानं बिघडत असून जर दोन दिवसांपेक्षा अधिक काळ त्यांचं उपोषण असंच सुरु राहिलं तर त्यांचं जिवंत राहणं अवघड होईल. या आधारावर कोर्टाकडं याचिकेद्वारे विनंती केली की, कोर्टानं केंद्र सरकारला निर्देश द्यावेत की त्यांनी लवकरात लवकर वांगचुक यांना रुग्णालयात भरती करावं. तसंच गरज पडल्यास त्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना फोर्स-फिडिंग अर्थात जबरदस्तीनं अन्न दिलं जावं. तसंच कोणत्याही नागरिकाचा जगण्याचा अधिकार सर्वोच्च आहे. तसंच राज्याची ही जबाबदारी आहे की त्या व्यक्तीचा जीव वाचवला जावा," असंही याचिकेत म्हटलं आहे.
या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, २८ जून २०२६ पासून सोनम वांगचूक जंतर-मंतरवर इतर विद्यार्थी कार्यकर्त्यांसोबत बेमुदत उपोषणाला बसले आहेत. यापूर्वी ६ जून आणि १९ जूनमध्ये देखील शिक्षण व्यवस्थेतील त्रृटी दूर कुन केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.