Fadnavis on Protest: CJPच्या आंदोलनावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया! पोलिसांच्या कारवाईचं केलं समर्थन; म्हणाले, नेतृत्वहीन आंदोलनाला...

Fadnavis on Protest: कॉक्रोच जनता पार्टीचा काल दिल्लीत भव्य मोर्चा निघाला, हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केले त्यात मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
Devendra Fadnavis_CJP Protest March
Devendra Fadnavis_CJP Protest March
Published on
Updated on

Fadnavis on Protest: कॉक्रोच जनता पार्टीचा काल दिल्लीत भव्य मोर्चा निघाला, हा मोर्चा दडपण्याचा प्रयत्न पोलिसांनी केले त्यात मोठ्या प्रमाणावर लाठीचार्ज करण्यात आला. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत. त्यामुळं दिल्ली पोलिसांच्या या कृतीचा देशभरातून निषेध व्यक्त केला जात असताना, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं. तसंच हे आंदोलन नेतृत्वहीन असल्याचा ठपकाही ठेवला.

Devendra Fadnavis_CJP Protest March
Bharat Banait: मार डालो सर...म्हणत दिल्ली पोलिसांच्या लाठ्या झेलणाऱ्या 'त्या' नागपूरकर तरुणाच्या आईचा संताप; म्हणाल्या, सरकारला शक्य नसेल तर...

मुख्यमंत्री माध्यमांशी बोलताना म्हणाले, "जेव्हा आंदोलनाला चेहरा नसतो तेव्हा काही प्रवृत्ती त्या आंदोलनात शिरतच असतात. या प्रवृत्ती त्या आंदोलनाचा फायदा घेऊन, त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपले स्वार्थ कसे पूर्ण करता येतील असा प्रयत्न करत असतात. दिल्लीत जे आंदोलन झालं यामध्ये अनेक राजकीय पक्ष आपली पोळी कशी भाजता येईल हा प्रयत्न करत आहेत. अनेक अशा संघटना ज्या संघटनांचं या विषयाशी घेणंदेणं नाही, त्या देखील अराजकता कशी तयार करता येईल याचा प्रयत्न करत असतात"

ज्यावेळी चेहरा नसलेलं आंदोलन असतं, त्यावेळी आपण दिल्लीत देखील बघितलं की, कशा प्रकारे नेतृत्वहीन व्यवस्था आपल्याला पाहायला मिळाली. पोलिसांच्या गाड्या फोडणं असेल गाड्या उलटवणं असेल, अशा गोष्टी तिथं घडल्या. कुठल्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणं आवडत नाही. पण ज्या प्रकारची अवस्था तिथं होती, जर पोलिसांनी कन्ट्रोल घेतला नसता तर अनेक अनावश्यक गोष्टी तिथं घडल्या असत्या. पोलिसांनी मोठा संयम देखील दाखवलेला आहे. अशा प्रकारचं आंदोलन योग्य पद्धतीनं व्हावं यापुरतं त्यावर कारवाई केली पाहिजे तेवढी पोलिसांनी केली आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन केलं आहे.

Devendra Fadnavis_CJP Protest March
Crime News : NCP SP नेत्याचे संपर्क कार्यालयच अज्ञाताने पेटवून दिलं; कागदपत्रे जळून खाक, CCTV कॅमेऱ्यात घटना कैद

दरम्यान, मी सरसकट सर्व आंदोलकांवर आरोप करु इच्छित नाही, असं सांगताना काही लोक चांगल्या भावनेनं आंदोलन करत असतील, पण हे निश्चितच आहे की काही लोक तिथं केवळ आपला स्वार्थ साधण्यासाठी घुसले आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय आहे. त्यांचं नीट परीक्षेशी काहीही घेणंदेणं नाही. काही जणांना नीट परीक्षा काय आहे? हे माहिती नाही. ही परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही. अनेक हौशे-गवशे-नवशे तिथं घुसलेले आहेत. त्याचबरोबर काही राजकीय पक्ष ज्यांना त्या त्या राज्यांमध्ये रिजेक्ट केलेलं आहे ते देखील यातून आपल्याला काही मिळवता येईल का? हे पाहत आहेत, असा आरोपही यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com